पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : 6-6-6-6-6..पण धोनीनं धुलाई नक्की केली कुणाची?

महेंद्रसिंह धोनी

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याने यंदाच्या १३ व्या हंगामातील आयपीएल स्पर्धेची सुरुवात होणार आहे. २९ मार्चला हे दोन्ही संघात लढत होईल. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर संघाबाहेर असणारा महेंद्रसिंह धोनी या स्पर्धेतून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करत आहे. या स्पर्धेतील धोनीच्या कामगिरीवर आगामी टी- विश्वचषकात धोनीला स्थान मिळणार का? याच उत्तरही कदाचित मिळू शकते.  

यंदाच्या हंगामात कडक कामगिरी करण्याचे संकेत धोनीने सराव सत्राला सुरुवात करताच दिले आहेत.  स्टार स्पोर्ट्स तमिळच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन धोनीचा सरावादरम्यानचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. चेन्नई सुपर किंग्ज सध्या एमए चिदंबरम या आपल्या घरच्या मैदानावर सराव करत असून धोनी धमाकेदार आणि तुफान फंलदाजी करत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.

कोरोनामुळे IPL वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही : गांगुली

३८ वर्षीय धोनीने सरावावेळी पाच चेंडूत पाच षटकार खेचत आयपीएलमध्ये हंगामा करणार असल्याचे संकेत दिले आहेत. नेट्समध्ये धोनीच्या मागे पियुष चावला आणि सुरेश रैना उभे असल्याचे पाहायला मिळते. धोनीने लगावलेले षटकार हे गोलंदाजाला मारले आहेत बॉलिंग मशिनवर त्याने आपल्या भात्यात फटकेबाजी असल्याचे दाखवून दिले हे स्पष्ट होत नाही.

पुण्यात क्रीडा विद्यापीठ, क्रीडा संकुलांच्या अनुदानात भरघोस वाढ

विश्वचषकानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली होती. रवी शास्री यांनी मात्र आयपीएल स्पर्धेतील कामगिरीवर त्याला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी जॅकपॉट लागू शकतो, असे संकेत दिले होते. ज्यापद्धतीने धोनीचा सराव सुरु आहे तो त्याच्या चाहत्यांना आनंद देऊन जाणारा असाच आहे, असे म्हणावे लागेल. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ms dhoni hit 5 sixes in a row during practice session of chennai super kings ahead of 13th ipl season