पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरमध्ये असेल लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीची पोस्टिंग

महेंद्रसिंह धोनी

टीम इंडियाचा क्रिकेटपटू आणि प्रादेशिक सैन्यदलातील मानद लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीचा लष्कर प्रशिक्षणाचा सर्वाधिक काळ जम्मू-काश्मीरमध्ये असेल. लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी धोनीच्या प्रशिक्षणाची मागणी मान्य केली आहे. धोनी आपल्या १०६ इन्फंट्री बटालियनबरोबर असेल. ही बटालियन पॅराशूट रेजिमेंट अंतर्गत आहे. धोनी या दरम्यान कोणत्याही मोहिमेचा हिस्सा नसेल, त्याच्या दोन महिन्याच्या प्रशिक्षणाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात होणार आहे. यासाठी धोनीने तयारी सुरु केली आहे. 

यादरम्यान धोनी काश्मीरमध्ये असेल. कारण १०६ इन्फंट्री बटालियन काश्मीरमध्ये तैनात आहे. या बटालियनचे मुख्यालय बंगळुरला आहे. दरम्यान, विश्वचषकानंतर धोनी निवृत्ती घेईन, असे वृत्त येत होते. परंतु, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या निवड समितीच्या बैठकीनंतर मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी धोनीच्या निवृत्तीची वृत्त फेटाळले होते. 

धोनीच्या निवृत्तीवर एमएसके प्रसाद यांची रिअ‍ॅक्शन

निवृत्तीचा निर्णय हा संपूर्णपणे वैयक्तिक असतो. महेंद्रसिंह धोनीसारख्या महान क्रिकेटपटूला कधी निवृत्ती घ्यायची हे माहीत असते, असे एमएसके प्रसाद म्हणाले. धोनीने पुढील महिन्यात होणाऱ्या विंडीज दौऱ्यापासून स्वतःला वेगळे केले आहे. त्याने याची माहिती यापूर्वीच बीसीसीआयला दिली होती. 

धोनीने यापूर्वी अनेकवेळा आपण क्रिकेटपटू नसतो तर कदाचित सैन्यदलात असतो, असे म्हटले आहे. त्याच्या किट बॅगवरही अनेक वेळा सैन्य दलाचा रंग असतो. विश्वचषकातही त्याने आपल्या ग्लोव्हजवर बलिदान बॅज लावला होता. त्याला आयसीसी आक्षेपही घेतला होता. 

धोनीने यापूर्वी २०१५ मध्ये आग्रा येथे एक महिन्याचे प्रशिक्षण घेतले होते.

धोनीची जागा कोण घेईल?, गौतम गंभीरने सांगितली तिघांची नावे

(स्रोतः लाइव्ह हिंदुस्थान)