पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019: धोनीचे चाहते सचिनवर भडकले

महेंद्रसिंह धोनी

विश्वचषकातील अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात संथ खेळी करणाऱ्या धोनी-केदारची सचिनने चांगलीच शाळा घेतली होती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा हा स्ट्रोक यष्टिरक्षक आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह  धोनीच्या चाहत्यांना रुचलेला नाही.  सचिन तेंडुलकरने इंडिया टुडे वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये धोनी-केदारच्या अफगाणिस्तान विरुद्धच्या धीम्या खेळीवर नाराजी व्यक्त केली होती.

दोघांनी चांगली भागीदारी रचली. पण धोनीचा खेळ सकारात्मक नव्हता, असे सचिनने म्हटले होते. त्याच्या या भूमिकेनंतर धोनीच्या चाहत्यांनी सचिन तेंडुलकरला ट्रोल केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून धोनीचे समर्थक सचिनच्या कामगिरीचा दाखला देत त्याला ट्रोल करत आहेत.

#INDvWI कोहलीपुढे मोठा प्रश्न, सचिनने दिला सल्ला!

धोनीच्या एका चाहत्याने ट्विटरवर लिहिलंय की, सचिन तेंडुलकर ९५ ते १०० च्या घरात खेळत असताना ५ धावांसाठी २० चेंडू घ्यायचा. सामना कोणत्याही परिस्थितीत असला तरी सचिनला आपले शतक महत्त्वाचे वाटायचे. त्यामुळे सचिनने धोनीच्या संथ खेळीवर प्रश्न उपस्थित करु नये. धोनीच्या आणखी एका चाहत्याने अर्जुन तेंडुलकरचा दाखला देत सचिनवर टीका केली आहे. सचिन फक्त स्वत:साठी खेळला. आता त्याला आपल्या मुलाला भारतीय संघातून खेळवायचे आहे, असा उल्लेख करत धोनी क्रिकेटचा राजा असल्याचे म्हटले आहे.  

मास्टर ब्लास्टर सचिनचा विक्रम धोक्यात, वॉर्नर करतोय पाठलाग!

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ms dhoni fans troll sachin tendulkar for criticizing his slow inning against afghanistan in icc cricket world cup