भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मध्य प्रदेशमधील कान्हा नॅशनल पार्कमध्ये भ्रमंती केली. त्याची पत्नी साक्षीने भटकंतीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. साक्षीने शेअर केलेल्या व्हिडिओनंतर चक्क धोनीने तिला ट्रोल केले. मात्र साक्षीनेही धोनीला प्रेमाने रिप्लाय दिल्याचेही व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले.
टीम इंडियाची टी-२० सामन्यात अनोखी हॅटट्रिक
साक्षीने धोनीसोबतचा एक व्हिडिओ इन्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून लाइव्ह शेअर केला होता. चाहत्यांनी या व्हिडिओला चांगलीच पसंती दिल्याचे पाहायला मिळाले. या व्हिडिओमध्ये धोनीने पत्नीची फिरकी घेण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. इन्टाग्राम फॉलोअर्स वाढवण्यासाठी साक्षी हे सर्व करत आहे, असे धोनी या व्हिडिओमध्ये म्हणतो. यावह तुझे फॉलोअर्स देखील मला फॉलो करतात बेबी, अशा शब्दांत साक्षीने धोनीला कडक रिप्लाय दिला आहे. काही दिवसांपूर्वी साक्षीने धोनीचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये धोनी रुममधून बाहेर पडत असताना साक्षी त्याला 'स्वीटी, क्यूटी' असे म्हणत छेडताना दिसले होते. पुन्हा आपला व्हिडिओ शेअर केल्यानंतर साक्षी हे सर्व फॉलोअर्स वाढवेत म्हणून करत असल्याचे म्हणत धोनीने तिची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला खरं पण क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर साक्षीने त्यावर चांगलाच स्ट्रेट ड्राईव्ह लगावल्याचे पाहायला मिळाले.
मॅच सुपर ओव्हरमध्ये कशी न्यावी हे न्यूझीलंडकडून शिकावं!
इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषकापासून महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाबाहेर आहे. तो पुन्हा मैदानात कधी दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता असली तरी या गोष्टीवर धोनी सध्या मौन बाळगून आहे. विश्वचषकानंतरची त्याची विश्रांतीचा काळ संपताना दिसत नाही. आयपीएलमध्ये तो मैदानात दिसेल अशी अपेक्षा आहे. जर या स्पर्धेत तो कशी कामगिरी करणार यावर त्याचे भविष्य अवलंबून असेल, अशी चर्चाही क्रिकेट वर्तुळात रंगताना दिसत आहे.
.@msdhoni : Dekho aapne Instagram ke followers badhne ke liye, ye sab kar rahe hai... @SaakshiSRawat : All your followers love me also no..
— MS Dhoni Fans Official (@msdfansofficial) January 30, 2020
Check out the hilarious convo here!🤣#Dhoni #Sakshi #MahiWay ❤️😇 pic.twitter.com/B0VNZ4mUOH