पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तब्बल ६ महिन्यानंतर धोनीने 'त्या' गोष्टीवरील मौन सोडलं

महेंद्रसिंह धोनी

इग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषकापासून भारताचा माजी  कर्णधार आणि यष्टिमागच्या चपळतेची मिसाल असलेला महेंद्रसिंह धोनी क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. विश्वचषकाला सुरुवात होण्यापासून धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चा जोर धरत होत्या. मात्र यावर त्याने आतापर्यंत कोणतेही भाष्य केलेले नाही. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होईल, असा अंदाज व्यक्त करत ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकात धोनीचा विचार होऊ शकतो, असे संकेत दिले आहेत.

टी-२० वर्ल्ड कपसाठी महिला ब्रिगेडची घोषणा, १५ वर्षाच्या मुलीलाही संधी

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात धोनी धावबाद झाल्यानंतर भारताच्या विश्वचषक उंचावण्याच्या स्वप्नाच चक्काचुरा झाल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगल्याचे पाहायला मिळते. कदाचित विश्वचषक आठवला की धोनी धावबाद झाल्याचा तो क्षण आपसूक क्रिकेट चाहत्यांना आठवल्याशिवाय राहत नाही. धोनी त्यावेळी बाद झाला नसता तर भारताने सामना नव्हे विश्वचषक जिंकला असता अशी भावना तमाम भारतीयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलून दाखवली होती. मात्र धोनीच्या मनात या गोष्टीबद्दल काय भावना आहेत हे आतापर्यंत गुलदस्त्यातच होते. नुकतेच एका मुलाखतीमध्ये धोनीने या क्षणाच्या आपल्या मनात असलेल्या  भावनांना मोकळी वाट करुन दिली.   

बुमराहला पॉली उम्रीगर पुरस्कार, शेफाली अन् पुनमचाही होणार सन्मान

इंडिया टुडेच्या बोरिया मजूमदार यांच्यासोबतच्या मुलाखतीमध्ये धोनीने यावर भाष्य केले आहे. त्याक्षणी डाइव का मारली नाही, याची मला खंत वाटते, असे धोनीने म्हटले आहे. धोनी म्हणाला की, दोन इंच अंतर अधूरे राहिल्यानंतर मी  स्वत:ला जाब विचारत होता. धोनी तू डाइव्ह  का नाही मारली? तू डाइव्ह मारायला हवी होतीस. धोनीच्या या भावना खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या उपांत्यफेरीतील सामन्यात आघाडीची फलंदाजी कोलमडल्यानंतर धोनी-जडेजा या जोडीकडून मॅच विनिंग खेळीची अपेक्षा निर्माण झाली होती. या जोडीने सातव्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली होती. धोनी ५० धावा करुन धावबाद होत तंबूत परतल्यानंतर भारताच्या विजयाची आस संपुष्टात आली होती.