पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनी मैदानात उतरण्याचं ठरलं, पण...

महेंद्र सिंग धोनी

विश्वचषक स्पर्धेपासून क्रिकेटच्या मैदानातून बाहेर असलेला महेंद्रसिंह धोनीला मैदानात पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. क्रिकेटच्या मैदानात तो कधी दिसणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र आता धोनी फुटबॉलच्या एका चॅरिटी सामन्यात मैदानात उतरणार असल्याचे पक्के झाले आहे. धोनी टेनिस स्टार लिएंडर पेस आणि बॉलिवूड कलाकार अर्जून कपूर यांच्यासोब मैदानात उतरणार आहे.

'शरद पवारांना राजकारण आणि समाजकारणातून कायमची विश्रांती देणार'

सोशल मीडियावर धोनी आणि पेस यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. मुंबईच्या मैदानात रंगणाऱ्या चॅरिटी  सामन्यासाठी धोनी-पेस यांनी सराव केला. सरावादरम्यानच्या फोटोमध्ये या जोडीने घातलेल्या टी-शर्टवर  'प्लेइंग फॉर ह्यूमेनिटी' असे लिहिले आहे. चॅरिटी सामन्याचे निमित्त आणि सामन्याची तारीख अद्याप स्पष्ट नाही.

पीबल्स, मेयर आणि क्वेलोज यांना यंदाचा भौतिक शास्त्राचा नोबेल

विश्वचषक स्पर्धेनंतर विंडीज दौऱ्यातून धोनीने माघार घेतली होती. त्यानंतर भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध देखील तो मैदाना उतरलेला नाही. धोनीची निवड न झाल्याने त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र बीसीसीआयने सध्या धोनीच्या निवृत्तीबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला होता.  

'सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने ओबीसींसाठी खूप कामं केली'

विश्व चषक स्पर्धेनंतर 38 वर्षीय महेंद्रसिंह धोनी प्रादेशिक सेनेसोबत काश्मीर खोऱ्यात गस्त घालण्यासाठी गेला होता.  दिवस त्याने देश सेवा केली. त्याच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतने एकदिवसीय आणि टी-२० सामन्यात भारताच्या यष्टिमाची जबाबदारी पार पाडली होती.

नोकऱ्या जाताहेत, उद्योग बंद पडताहेत हे स्वीकारा- उद्धव ठाकरे   

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:MS Dhoni and Leander Paes and Arjun Kapoor come together for charity football match in Mumbai see pics