पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या पाच दिग्गज क्रिकेटर्सच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

विराट आणि मेग्रा (संग्रहित छायाचित्र)

क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम रचत आपला दबदबा निर्माण करणारे अनेक खेळाडू तुम्ही पाहिले असतील. स्टार क्रिकेटर्संना आपल्या कारकिर्दीत अनेकदा लाजीरवाण्या विक्रमालाही सामोरे जावे लागते. काही त्यातून सावरुन पुन्हा उभे राहतात तर काहींच करियर कधी संपत हे देखील कळत नाही. क्रिकेटच्या मैदानात फक्त फलंदाजच नाही तर गोलंदाज जेव्हा फलंदाजी करण्यास मैदानात येतो तेव्हा त्याच्यासाठी पहिली धाव ही खूप महत्त्वाची असते. अनेकदा प्रतिस्पर्धी गोलंदाज फलंदाजाला खातेही उघडू देत नाही, असे सामने तुम्ही नक्की पाहिले असतील. आपल्या पसंतीचा फलंदाज शून्यावर बाद होणे हे कोणत्याही क्रिकेट चाहत्याला कदापी आवडत नाही. पण अनेकदा या अनिश्चिततेच्या खेळात धावांची बरसात करणारा फलंदाजावरही शून्यावर माघारी परतण्याची वेळ येते.

WWE 24*7 चॅम्पियनशिप : काही क्षणाचा चॅम्पियन!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम हा एका गोलंदाजाच्या नावावर आहे. या यादीत पहिल्या पाच खेळाडूंमध्ये श्रीलंकेचे तीन तर विंडीज आणि ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूचा समावेश आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा आतापर्यंत ४०१ सामन्यांतील ४४४ डावात २५ वेळा शून्यावर बाद झाला आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या दोन दशकाहून अधिक कारकिर्दीत तब्बल ३४ वेळा शून्यावर बाद झाला आहे.  

मुरलीधरन#१ मुथया मुरलीधरन- ५९ वेळा शून्यावर बाद झाला...
मुरलीधरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात ही १९९२ मध्ये केली. सर्वाधिक विकेट मिळवण्याचा पराक्रम करणाऱ्या श्रीलंकन फिरकीपटूच्या नावे फलंदाजीमध्ये शून्यावर बाद होण्याचा लाजीरवाणा विक्रमही आहे.  मुरलीधरनने ४९५ आंतरराष्ट्रीय सामन्यात १ हजार ९३६ धावा केल्या आहेत. दरम्यान आपल्या कारकिर्दीत तो तब्बल ५९ वेळा शून्यावर बाद झाला आहे. 
मुरलीधरनने गोलंदाजीमध्ये १३३ सामन्यात ८०० बळी मिळवण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे. एकदिवसीय सामन्यात त्याने ३४१ सामन्यात ५१९ बळी टिपले आहेत.  
कर्टनी वॉल्श
#२ कर्टनी वॉल्श - ५४ वेळा खातेही उघडू शकले नाहीत
वेस्ट इंडिजचे कर्टनी वॉल्श हे क्रिकेटच्या मैदानातील एक प्रसिद्ध नाव आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांच्या नावे अनेक विक्रमांची नोंद आहे. यात शून्यावर सर्वाधिक वेळा बाद होण्याच्या लाजीरवाण्या विक्रमाचाही समावेश आहे. वॉल्श आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत ५४ वेळा खातेही उघडू शकले नव्हते. विंडीजच्या ताफ्यातील भेदक माऱ्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जलदगती गोलंदाजाला ३३७ सामन्यात एकही शतकी किंवा अर्धशतकी खेळी करता आली नाही. १३२ कसोटी सामन्यात त्यांनी ५१९ तर २०५ एकदिवसीय सामन्यात २२७ बळी टिपले आहेत.  
सनथ जयसूर्या
#३ सनथ जयसूर्या- ५३ वेळा भोपळा!
सनथ जयसूर्याने श्रीलंकेकडून १९८९ पासून २०११ पर्यंत प्रतिनिधीत्व केले. आपल्या मोठ्या कारकिर्दीत त्याने अनेक विक्रमाला गवसणी घातली. मात्र जयसूर्याला शून्यावर सर्वाधिक वेळा बाद होण्याच्या ग्रहणापासून वाचता आले नाही. ५८६ सामन्यात श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केलेल्या जयसूर्याच्या नावे ५३ वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम आहे. 
विराट आणि मेग्रा (संग्रहित छायचित्र)
#४ ग्लेन मेग्रा- ४९ वेळा शन्यावर बाद झाला!
आपल्या अचूक टप्प्याने प्रतिस्पर्धी फलंदाजाला हैराण करणाऱ्या ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज ग्रेन मेग्रा फंलदाजीत फारसा भरवशाचा खेळाडू नव्हता. सर्वाधिक ६१ धावांसह त्याच्या नावे एका अर्धशतकाची नोंद आहे. तो तब्बल ४९ वेळा शून्यावर बाद झाला आहे.   
संगकारा आणि जयवर्धने
#५ जयवर्धनेवरही ४७ वेळा ही नामुष्की झेलावी लागली
श्रीलंकेनं सघातील भरवशाचा खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला जयवर्धनने २०११ च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात शतकी खेळी करुन भारतासमोर तगडे आव्हान निर्माण केले होते. याशिवाय त्याने अनेकदा सामन्याला कलाटणी देणारी खेळी केल्याचे पाहायला मिळाले. पण त्याच्यावरही सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावल्याचे पाहायला मिळाले. ६५२ सामन्यात तो तब्बल ४७ वेळा शून्यावर बाद झाला आहे. 

हार्दिकचा साखरपुडा अन् कॅप्टन कोहलीला आश्चर्याचा सुखद धक्का