पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोहम्मद शमीला दिलासा, अटकेला स्थगिती

मोहम्मद शमी

कौटुंबिक हिसांचार प्रकरणात अटक वॉरंटचा सामना करत असलेला टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला दिलासा मिळाला आहे. शमीचे वकील सलीम रहमान यांनी याची माहिती दिली. 

वेस्ट इंडीज दौरा संपल्यानंतर शमी अमेरिकेला गेला आहे. तो आता बीसीसीआयबरोबरच आपल्या अमेरिकेच्या वकिलाच्याही संपर्कात होते. शमीवर त्याची पत्नी हसीन जहाँने कौटुंबिक हिसांचाराचे आरोप लावले होते. न्यायालयाने शमीवर १५ दिवसांच्या आत शरण येण्यास आणि जामीन अर्ज देण्याचा आदेश दिला होता.

विक्रम लँडर सापडला पण झुकलेल्या अवस्थेत...

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, शमी १२ सप्टेंबरला भारतात परतेल. सध्या तो आपले वकील सलीम रहमान यांच्याशी संपर्कात आहे.

जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत शमीविरोधात मंडळ कोणतीही कारवाई करणार नाही, असे बीसीसीआयने २ सप्टेंबरला स्पष्ट केले होते.

काय आहे शमी-हसीन जहाँ वाद
मागील वर्षी मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतल्यानंतर त्याचा पत्नी हसीन जहाँबरोबर वाद झाला होता. हसीन जहाँने आपल्या फेसबुक अकाऊंटवर अनेक छायाचित्रे आणि व्हॉट्सअपचे स्क्रीनशॉट शेअर करत शमीचे अनेक मुलींबरोबर अवैध संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर हा वाद सार्वजनिकही झाला होता. त्यानंतर हसीन जहाँने मारहाण, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, कौटुंबिक हिसांचार आणि मॅच फिक्सिंगसारखे अनेक गंभीर आरोप केले होते.

पाकचा कुटील डाव; मसूद अझहरला गुप्तपणे कारागृहातून सोडलं