पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'तुझी खूप आठवण येते' मोहम्मद शमीचे भावूक ट्विट

क्रिकेटर मोहम्मद शमी

भारतीय क्रिकेट संघाचे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या मुलीचा आज वाढदिवस आहे. मुलीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत मोहम्मद शमीने भावूक ट्विट केले आहे. 'मी लवकरच तुला भेटायला येत आहे.' असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, आईसीसी वर्ल्ड कप - २०१९ मध्ये चार सामन्यामध्ये १४ विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीचे सर्वच स्तरावर सध्या कौतुक होत आहे.

'काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार याच आठवड्यात राजीनामा देतील'
मोहम्मद शमीच्या मुलाचा चौथा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्याने मुलीला शुभेच्छा देत भावूक ट्विट केले. 'माझी प्रिय मासूम हा दिवस तुझ्या आयुष्यात सतत येईल. तुझी खूप आठवण येत आहे. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. घाबरु नको. मी लवकरच तुला भेटण्यासाठी येत आहे.' असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. 

'चांद्रयान २'च्या प्रक्षेपणाची नवी तारीख जाहीर

कौटुंबिक वादामुळे शमीची पत्नी हसीन जहां आणि त्याची चार वर्षाची मुलगी आयरा शमीपासून दूर राहत आहेत. शमी नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या मुलीची आठवण काढत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या लाडक्या मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता ज्यामध्ये आयरा डान्स करत होती.

अयोध्याप्रकरणी मध्यस्थ समितीला अहवाल सादर करण्यास मुदतवाढ

दरम्यान, मागच्या वर्षी मार्च महिन्यामध्ये हसीना जहांने पती मोहम्मद शमीवर अनेक गंभीर आरोप केले होते. हसीना शमीवर मारहाण, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसा आणि मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप लावले आहेत. मात्र मोहम्मद शम्मीने या सर्व आरोपांना फेटाळून लावले होते. मात्र हसीना जहां देखील या आरोपांना आतापर्यंत सिध्द करु शकली नाही. शम्मी आणि हसीना जहां यांच्यामध्ये अजूनही कायदेशीर लढाई सुरुच आहे. 

'काँग्रेसमुक्त महाराष्ट्र'लाच प्राधान्य - चंद्रकांत पाटील