पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC Ranking: शमी- मयांकची टेस्ट कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी

शमी, कोहली आणि मयांक

India vs Banglades, 1st Test at Indore: इंदूरच्या मैदानात रंगलेल्या सलामीच्या कसोटी सामन्यात भारताने पाहुण्या बांगलादेशला १ डाव आणि १३० धावांनी पराभूत केले. या विजयात सलामीवीर मयांक अग्रवाल आणि मोहम्मद शमी यांनी मोलाचा वाटा उचलला. या सामन्यातील कामगिरीच्या जोरावर दोघांनी आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. 

तिसऱ्या दिवशीच 'शेर ए बांग्ला' ढेर! भारताचा 'विराट' विजय

पहिल्या डावात २७ धावा खर्च करुन ३ आणि दुसऱ्या डावात ३१ धावा खर्च करत ४ बळी मिळवलेल्या शमी आठ स्थानांनी सुधारणा करत सातव्या स्थानावर पोहचला आहे. त्याच्या खात्यात आता ७९० गुण जमा झाले आहेत. कसोटी क्रमवारीत गोलंदाजीमध्ये ७९० रेटिंगपर्यंत पोहचलेल्या मोजक्या भारतीय गोलंदाजामध्ये तो सहभागी झाला. यापूर्वी कपिल देव (८७७) आणि जसप्रीत बुमराह (८३२) अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.  

INDvsBAN: मयांकच्या द्विशतकासह टीम इंडियाच्या नावे अनोखा विक्रम

फलंदाजांच्या क्रमवारीत मयांक अग्रवालने ११ व्या स्थानावर मजल मारली. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात २४३ धावांची खेळी साकारली होती. कारकिर्दीतील पहिल्या ८ कसोटी सामन्यात मयांकच्या नावे ८५८ धावा आहेत. या कामगिरीच्या जोरावर त्याच्या खात्यात ६९१ गुण जमा झाले आहेत. पहिल्या आठ कसोटी सामन्यात सात फलंदाजांनी मयांकपेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे. यात डॉन ब्रॅडमन (१२१०), एवर्टन वीक्स (९६८), सुनील गावसकर (९३८), मार्क टेलर (९०६), जॉर्ज हेडली (९०४), फ्रँक वारेल (८९०) आणि हर्बर्ट सटक्लिफ (८७२) या दिग्गज फलंदाजांच्यानंतर मयांकचा नंबर येतो.