पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BCCI च्या हस्तक्षेपानंतर शमीला मिळाला अमेरिकेचा व्हिसा!

मोहम्मद शमी

पत्नीने केलेल्या आरोपामुळे जदलगती गोलंदाज मोहम्मद शमीला पुन्हा एकदा अडचणींना सामोरे जावे लागले. पत्नीवर अत्याचार केल्याचा  आरोप असल्यामुळे अमेरिकेने शमीचा व्हिसा नाकारला होता. पण बीसीसीआयने हस्तक्षेप केल्यानंतर अमेरिकेने त्याला व्हिसा मिळाला. 

बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, भारतीय क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष राहुल जौहरी यांनी अमेरिका दुतवास विभागाला पत्र लिहिल्यामुळे शमीला व्हिसा मिळाला. राहुल जौहरी यांनी लिहिलेल्या पत्रात मोहम्मद शमीच्या मैदानातील कामगिरीसह त्याची पत्नी हसीन जॅहा सोबतच्या वादासंदर्भातील प्रकरणाचा उल्लेखही करण्यात आला होता. 

 

'तुझी खूप आठवण येते' मोहम्मद शमीचे भावूक ट्विट

बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसरस शमीने व्हिसा अमेरिकेकडून नाकारण्यात आला होता. पोलिस तक्रारीमुळे त्याच्यावर ही वेळ आली होती. आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर त्याला व्हिसा देण्यात आला. ते पुढे म्हणाले. ' ज्यावेळी पहल्यांदा त्याला व्हिसा नाकारण्यात आला होता. त्यावेळी राहुल जौहरी यांनी याप्रकरणात हस्तक्षेप केला होता. भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यातील पहिले दोन टी-२० सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथील लॉडरहिल शहरात खेळणार आहे.  

उल्ल्खेनिय आहे की, २०१८ च्या सुरुवातीला मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहॉ यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. यावेळी हसीन जहॉने शमीवर मारहाण, बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न केल्याचे आरोप लगावले होते. तिने शमीविरोधात तक्रारही दाखल केली आहे.