पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दादा ओरडत असताना कैफ म्हणाला होता की, मी पण खेळायला आलोय!

युवी-कैफ जोडीने नेटवस्ट मालिका गाजवली होती.

क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानात नेटवस्ट सीरीजच्या अंतिम सामन्यातील युवी- कैफ जोडीने अठरावर्षांपूर्वी केलेली खेळी क्रिकेट चाहत्याच्या आजही स्मरणात आहे. इंग्लंडनचे दिलेल्या ३२६ धावांचा पाठलाग करुन भारतीय संघाने क्रिकेटच्या मैदानात  ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली होती. सामना जिंकल्यानंतर दादा (भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार सौरव गांगुली) याने जर्सी काढून आनंद साजरा केल्याचा किस्सा सर्वांनाच परिचित आहे. याच सामन्यात गांगुलीने पाठवलेल्या मेसेजनंतर काय भूमिका घेतली होती याचा खुलासा नुकताच कैफ-युवीने केलाय.  

सध्याच्या परिस्थितीत क्रिकेट स्पर्धा होणे मुश्किलच : गांगुली

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटसह अन्य खेळ स्पर्धेला ब्रेक लागला आहे. कोरोना विरोधातील सामना जिंकण्यासाठी देशव्यापी लॉकडाउनची नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यानच्या काळात आजी-माजी क्रिकेटर घर बसल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन करत क्रिकेटच्या मैदानातील किस्से आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहेत. नेटवेस्ट सीरीजमधील अखेरच्या निर्णयाक सामन्यात भारतीय संघ अडचणीत सापडला असताना कैफ-युवी जोडी मैदानात होती. यावेळी गांगुलीने ड्रेसिंगरुममधून कैफसाठी एक खास मेसेज पाठवला होता. युवी-कैफ जोडीने इन्टा लाइव्हमध्ये याचा उल्लेख केलाय. 

कोविड -१९: दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंका दौरा स्थगित

लाइव्ह चॅटमध्ये कैफ म्हणतोय की, मला अजूनही आठवतंय की दादा मला ओरडून ओरडून एकेरी धाव घेऊन युवराजला स्ट्राइक दे! असे सांगत होता. दादाने मला स्ट्राइक दे सांगितल्यावर तू काय केलेस? असा प्रश्न युवीने कैफला केला. आखूड टप्प्याच्या चेंडूवर षटकार खेचून मी संघाच्या धावसंख्येत भर घातली, असे कैफने सांगितले. षटकार मारल्यानंतर मी देखील खेळायलाच आलोय असे कैफने म्हटल्याचा किस्साही युवीने शेअर केला. या षटकारानंतर दादाला मी देखील मोठे फटके मारु शकतो हे लक्षात आले. त्यानंतर त्याने एकेरी धाव घेण्याचा अट्टाहासही सोडून दिला, असेही या जोडीने सांगितले. या सामन्या कैफने चेंडूत ७५ नाबाद ८७ धावांची खेळी केली होती.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Mohammad Kaif ignored Sourav Ganguly s advice and hammered a six during netwest series 2002 final match against england shared this with yuvraj singh during instagram live chat