पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

क्रिकेटच्या देवाला दिली कृष्णाची उपमा, कैफ म्हणाला फिलिंग लाइक सुदामा

सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद कैफ

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव असे मानले जाते. क्रिकेटच्या मैदानात अशक्यप्राय विक्रमाची नोंद केल्याने सचिनला देवाची उपमा दिली गेली आहे. क्रिकेटचा देव असा उल्लेख आला की आपसूक नाव येत ते आपल्या मुंबईकर सचिनचं. पण क्रिकेटच्या या देवाला माजी क्रिकेटर आणि सध्याच्या घडीला समालोचक म्हणून सामन्यादरम्यान दिसणाऱ्या मोहम्मद कैफनं कृष्णाची उपमा दिली आहे. 

तब्बल ६ महिन्यानंतर धोनीने 'त्या' गोष्टीवरील मौन सोडलं

मोहम्मद कैफन मास्टर ब्लास्टर सचिनसोबतचा एक फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलाय. या फोटोला कॅप्शन देताना कैफने स्वत: ला सुदामा आणि सचिनला कृष्ण असे संबोधले आहे.  'भगवान कृष्णासोबत सुदामाची फिल या कॅप्शनसही कैफने हा फोटो शेअर केला. या फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. कैफच्या या पोस्टमुळे नेटकरी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

बुमराहला पॉली उम्रीगर पुरस्कार, शेफाली अन् पुनमचाही होणार सन्मान

भारतीय क्रिकेट संघाला लाभलेल्या चपळ क्षेत्ररक्षकांच्या यादीतील कैफ हा आघाडीच्या खेळांडूमधील एक आहे. जूलै २०१८ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. १३ जूलै २००२ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या नेटवेस्ट ट्रॉफीतील त्याची खेळी क्रिकेट चाहता आजही विसरलेला नसेल. आघाडीची फलंदाजी कोलमडल्यानंतर कैफने युवराज सिंगच्या साथीने दमदार भागीदारी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. या सामन्यात तो विजयी धाव घेऊनच परतल्याचे पाहायला मिळाले होते.  १२५ एकदिवसीय सामन्यात कैफने २ हजार ७५३ धावा केल्या आहेत. कसोटीतील १३ डावात त्याच्या नावे ३२४ धावा जमा आहेत. यात एका शतकाचाही समावेश आहे.