पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यावर मितालीचा शाब्दिक मारा

मिताली राज

मातृभाषेच्या मुद्यावरुन सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या  नेटकऱ्याची मिताली राजने चांगलीच शाळा घेतली आहे. दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाला ३-० अशी क्लिन स्वीप दिल्यानंतर मितालीने एक ट्विट केले होते. ज्या ट्विटवरुन एका नेटकऱ्याने तिला ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले. मितालीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाचा हा १०० वा विजय होता.   

फिफा वर्ल्ड कप पात्रता : अखेरच्या क्षणी भारताचा पराभव टळला, पण...

मिताली तमिळनाडूची आहे. हा मुद्दा उपस्थित करत एका नेटकऱ्याने लिहिले होते की, मिताली सर्वाधिकवेळा इंग्रजी, हिंदी किंवा तेलुगू भाषेचा वापर करताना दिसते. तमिळ येत नसल्याचा उल्लेखही या नेटकऱ्याने केला होता. मितालीने या नेटकऱ्याने चोख प्रत्त्युतर दिले आहे. तमिळ माझी मातृभाषा आहे. ती भाषा मला अवगत आहे.

प्रो-कबड्डीची दंगल! चार संघ फायनल गाठण्यासाठी घेणार 'पंगा'

तमिळनाडूची असल्याबद्दल मला अभिमान आहेच त्यापेक्षाही भारतीय असल्याचा अभिमान अधिक आहे. मला काय करायला हवे काय नाही हे मला शिकवण्याची गरज नाही. या शाब्दिक माऱ्यासह मितालीने टेलर स्विफ्टचं  'काम डाउन' या लोकप्रिय गाण्याची लिंक शेअर करत नेटकऱ्याला झोडपले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: mithali raj shuts up troll criticising her proud to live in tamil nadu but above all i am an indian