पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

T-20 :विराट-रोहितअगोदर २००० धावांचा टप्पा गाठणाऱ्या मितालीची निवृत्ती

मिताली राज

भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. या प्रकारातून निवृत्ती घेतल्यानंतर आता ती फक्त एकदिवसीय क्रिकेटवर लक्षकेंद्रीत करणार आहे. मितालीने ३२ टी -२० सामन्यात भारताचे नेतृत्व केले असून यात तीन महिला क्रिकेट विश्वचषकाचाही समावेश आहे.  

तापसी महिला क्रिकेटर मितालीची भूमिका साकारणार

भारतीय महिला क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर अशी ओळख निर्माण करणाऱ्या मिताली राजने  २०१२ मध्ये श्रीलंका, २०१४ मध्ये बांग्लादेश आणि २०१६ मध्ये भारतात रंगलेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. या तिन्ही वेळेस भारतीय संघाला विश्वचषकावर नाव कोरण्यात अपयश आले. 

वेस्ट इंडिजला व्हॉईट वॉश, विराट कोहली ठरला सर्वात यशस्वी कर्णधार!

मिताली राज भारताची पहिली टी-२० कर्णधार आहे. २००६ मध्ये डर्बीच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध तिने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारतीय संघाचे पहिल्यांदा नेतृत्व केले. भारताकडून सर्वात प्रथम २००० धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रमही तिच्या नावे आहे. विशेष म्हणजे मिताली राजने रोहित शर्मा आणि विराट कोहीलच्या अगोदर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २ हजार धावांचा पल्ला गाठला होता. मिताली राजने ८८ टी-२० सामन्यात १७ अर्धशतकांसह २ हजार ३६४ धावा केल्या आहेत. भारतीय महिला क्रिकेटमध्ये ही सर्वोच्च धावसंख्या आहे.