पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC:पत्नीचा खेळ पाहण्यासाठी स्टार्कने आफ्रिका दौरा अर्ध्यावर सोडला

एलिसा हिली आणि मिचेल स्टार्क

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेतच्या फायनलमध्ये भारतीय महिला आणि यजमान ऑस्ट्रेलियन महिला यांच्यात लढत होणार आहे. मायभूमीत रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकातील फायनलसाठी ऑस्ट्रेलियन बोर्डाने पुरुष संघातील जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्कला पत्नीचा खेळ पाहण्यासाठी रजा दिली आहे. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिन पुरुष संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे.  

Video : 6-6-6-6-6..पण धोनीनं धुलाई नक्की केली कुणाची?

ऑस्ट्रेलियन संघाने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-० अशी गमावली असून दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अखेरचा सामना हा शनिवारी खेळवण्यात येणार आहे. स्टार्कला संघाने रिलिज केले असून तो पत्नी एलिसा हिली हिचा खेळ प्रत्यक्षात मैदानात उपस्थितीत राहून पाहू शकणार आहे. मेलबर्नच्या घरच्या मैदानात एलिसाला विश्वचषकातील फायनलमध्ये खेळताना पाहणे मिचच्या (मिचेल) आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण क्षण असेल. त्यामुळे आम्ही त्याला तिसऱ्या सामना न खेळता मायदेशी परतण्याची संधी दिली, असे ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक लँगर यांनी म्हटले आहे. पत्नीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही त्याला मायदेशी जाण्याची परवानगी दिल्याचा आम्हाला आनंद आहे, असेही ते म्हणाले.  

Video : आयसीसीच्या या ट्विटमुळे सुरु झाली लग्नाची चर्चा!

ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या यष्टिरक्षक आणि फलंदाज एलिसा हिली ही यजमानांच्या संघातील प्रमुख खेळाडू आहे. तिच्यामध्ये सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असून ती भारतीय महिला संघासाठी डोकेदुखी ठरु शकते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सलामीच्या सामन्यानेच महिला विश्वचषकाला सुरुवात झाली होती. सलामीच्या सामन्यात भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाला पराभूत करत स्पर्धेत दमदार सुरुवात केली होती. कामगिरीतील सातत्य राखून भारतीय महिला एतिहासिक विजय नोंदवणार की सलामीच्या सामन्यात पराभवाचा बदला घेत ऑस्ट्रेलिन महिला आणखी एकदा विश्वचषक उंचावणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Mitchell Starc to miss 3rd ODI against South Africa to watch wife Alyssa Healy in Womens T20 World Cup final against India