पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

T20 : 'अभय' खेळीनं नेगीची लोकेशच्या विक्रमाशी बरोबरी

अभय नेगी

Syed Mushtaq Ali Trophy 2019:  मेघालयचा अष्टपैलून अभय नेगीने सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत एतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे.  मिझोराम विरुद्धच्या सामन्यात त्याने १४ चेंडूत अर्धशतक झळकावले. २७ वर्षीय नेगीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा अक्षरक्ष: धुलाई केली. या अर्धशतकी खेळीने नेगीने रॉबिन उथप्पाचा विक्रम मागे टाकत लोकेश राहुलच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. 

इन्स्टाग्राम पोस्ट नडली! स्मिथवर निलंबनाची कारवाई

टी-२० क्रिकेटमध्ये लोकश राहुल आणि अभय नेगी सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आहेत. लोकेश राहुलने आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना १४ चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती. या सामन्यात अभयने १५ चेंडूत ५० धावा करुन नाबाद राहिला. या खेळीत त्याने २ चौकार आणि ६ षटकार खेचले. टी-२० मध्ये सर्वाधिक जलद अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रम हा भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगच्या नावे आहे. २००७ मध्ये त्याने टी-२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात १२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. 

IPL 2020: ..तर स्टेन'गन' मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिसेल

सामन्यानंतर नेगी म्हणाला की, संधी मिळाल्यानंतर माझ्या मनमुराद खेळायचे हीच माझी रणनिती होती. मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा घ्यायचा हाच विचाराने फलंदाजी केली. त्यात मी यशस्वी ठरलो. उल्लेखनिय आहे की. अभय नेगीच्या दमदार खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात ४ बाद २०७ धावा केल्या होत्या. मिझोरामने संघर्षमय लढत दिली. मात्र २५ धावांनी दूर राहिली. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Meghalaya batsman Abhay Negi creates history in Syed Mushtaq Ali Trophy slams 50 off 14 balls watch video