पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

३० वर्षांपूर्वी 'त्यांनी' सचिन तेंडुलकर, तर आता अर्जुनची केली निवड

अर्जुन तेंडुलकर (PTI)

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावे क्रिकेट जगतातील अनेक विक्रमांची नोंद आहे. जेव्हा तो शालेय क्रिकेट खेळत होता, तेव्हाही त्याने काही विक्रम नोंदवले आहेत. त्याने डिसेंबर १९८८ मध्ये गुजरातविरोधात मुंबईकडून रणजी स्पर्धेत पदार्पण केले होते. त्याला ही संधी त्यावेळचे मुंबई क्रिकेट मंडळाचे तत्कालीन निवड समिती प्रमुख नरेन ताम्हाणे यांनी दिली होती. त्या निवड समितीमध्ये माजी रणजी कर्णधार मिलिंद रेगे यांचाही समावेश होता. 

शिखर-श्रेयस अय्यरचा VIDEO पाहिल्यास हसू आवरणार नाही

आता या गोष्टीला ३० वर्षांहून अधिक काळ गेला आहे. आता सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा विझी ट्रॉफीसाठी मुंबई संघात मिलिंद रेगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीनेच निवड केली आहे. रेगे हे सध्या मुंबई क्रिकेट संघटनेचे निवड समिती प्रमुख आहेत. ही स्पर्धा बीसीसीआयकडून आयोजित केली जाते. ही स्पर्धा २३ वयोगटाखालील खेळाडुंसाठी आयोजित केली जाते.

अर्जुन डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. मंगळवारी मुंबई क्रिकेट संघटनेने त्याची विझी ट्रॉफीसाठी मुंबई संघात निवड केली आहे. यापूर्वी अर्जुन टी २० मुंबई लीग खेळला आहे. 

ख्रिस गेलला मैदानावरच डान्स शिकवतानाचा विराटचा व्हिडिओ व्हायरल

यावर प्रतिक्रिया देताना रेगे म्हणाले की, वडिलाला आणि मुलाला एकाच निवडकर्त्याने संघात समावेश करण्याचा प्रकार यापूर्वी कधी झाला होता की नाही याची मला माहिती नाही. दोघेही तेंडुलकर आहेत, हा निव्वळ योगायोग आहे. अर्जुनच्या गोलंदाजीच्या क्षमतेने मला प्रभावित केले. १९ वर्षांच्या अर्जुनने मुंबईकडून १४, १६ आणि १९ वर्षांखालील स्पर्धांमध्ये खेळला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Meet the man who selected both Sachin Tendulkar and his son Arjun to represent Mumbai 30 years apart