पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पद्म' पुरस्कारांसाठी या महिला खेळाडूंच्या नावांची शिफारस

मेरी कोम

भारताच्या क्रीडा इतिहासात पहिल्यांदाच 'पद्म विभूषण' या दुसऱ्या सर्वोच्च नागरिक पुरस्कारासाठी महिला खेळाडूची शिफारस करण्यात आली आहे. बॉक्सिंगमध्ये सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली बॉक्सर मेरी कोम हिच्या नावाची 'पद्म विभूषण'  पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. मेरी कोम हिला २०१३ मध्ये 'पद्मभूषण' आणि २००६ मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यापूर्वी क्रीडा विभागात तीन पुरुष खेळाडूंना 'पद्म विभूषण' पुरस्कार देण्यात आला आहे. त्यात बुद्धीबळ पटू विश्वनाथन आनंद, क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि गिर्यारोहक सर एडमंड हिलेरी यांच्या नावाचा सहभाग आहे. 

टीम इंडियाच्या चौथ्या क्रमांकाच्या तिढ्यावर बांगर यांनी सोडले मौन

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिच्या नावाची 'पद्मभूषण' पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. २०१५ मध्ये सिंधूला 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. २०१७ मध्ये 'पद्मभूषण' पुरस्कारासाठी सिंधूच्या नावाची  शिफारस करण्यात आली होती मात्र या यादीत तिला स्थान मिळवता आलं नाही.

...म्हणून सोनम कपूरचा 'द झोया फॅक्टर' धोनीला समर्पित

मेरी कोम आणि सिंधूव्यतिरिक्त कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मोनिका बत्रा, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, हॉकीपटू रानी रामपाल, माजी शूटर सुमा शिरूर आणि गिर्यारोहक असलेल्या जुळ्या बहिणी ताशी आणि नुंगशी मलिक यांच्या नावाची शिफारस 'पद्मश्री' पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:MC Mary Kom nominated for Padma Vibhushan and Shuttler PV Sindhu nominated for Padma Bhushan