पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मॅक्सवेलचं कौतुक करताना विराटने सांगितला स्वत:चा अनुभव

विराट कोहली

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लॅन मॅक्सवेलच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. मॅक्सवेलने खूप महत्त्वाचा मुद्दा सर्वांसमोर आणला, असे सांगत त्यांने आपल्या जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहलीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विश्रांतीनंतर परतलेल्या कोहलीने मॅक्सवेलच्या अनिश्चित काळाच्या विश्रांतीवर भाष्य केले.  

INDvBAN: डे-नाइट टेस्टची वेळ ठरली!

२०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर विराटला एकही अर्धशतक झळकावता आलेले नव्हते. त्यावेळी सर्व काही संपल्याची भावना मनात घर करुन होती, असे विराटने म्हटले आहे. क्रिकेट कारकिर्दीत असाही एक क्षण आला होता जेव्हा मला संगल संपले आहे असे वाटत होते. काय करावं, कोणाशी संवाद साधायचा याबाबत काहीच कळत नव्हतं. मानसिकरित्या ढळलोय हे सांगाव की नाही. त्याचा अर्थ काय घेतील यासारखे प्रश्न मनात होते, असेही विराट यावेळी म्हणाला. या दौऱ्यात ५ कसोटी सामन्यातील १० डावात विराट कोहलीने १३.५० च्या सरासरीने केवळ १३४ धावा केल्या होत्या. 

भारतीय संघाबद्दल शोएब अख्तर म्हणाला की,...

विराट पुढे म्हणाला की, मॅक्सवेलने जगभरातील क्रिकेटर्ससमोर एक चांगले उदाहरण ठेवले आहे. तुम्ही मानसिकरित्या संतुलित नसाल तर तुम्ही यशस्वी ठरु शकत नाही. अशावेळी तुम्हाला विश्रांतीची गरज असते. मागे हटणे म्हणजे पराभव नसून स्पष्टतेसाठी योग्य वेळ देणे गरजेचे असते, असेही विराट यावेळी म्हणाला. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलसह निक मॅडीसन यांनी मानसिक ताण आणि समस्यांमुळे क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता.