पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनमध्ये BCCI कडून केंद्र सरकारला अशीही मदत

बीसीसीआय अधिकाऱ्याने पाक बोर्डाच्या अध्यक्षांना फटकारले

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्यामुळे सध्या संपूर्ण देशावर लॉकडाऊनची वेळ आली आहे. क्रीडा क्षेत्रावरही याचा परिणाम झाला असून मैदानावरही शांतता दिसत आहे. दरम्यान बीसीसीआयने घरात बसून असलेल्या आपल्या क्रिकेट चाहत्यांसाठी जून्या सामन्याचे प्रेक्षपण करण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे जून्या सामन्यांची झलक ही दूरदर्शनवर दाखवण्यात येणार आहे. बीसीसीआय दूरदर्शनकडून कोणतेही शूल्क घेणार नाही.

कोरोनाशी लढण्यासाठी 'फिव्हर क्लिनिक्स', ४ टप्प्यात रुग्णालयाची विभागणी

सामन्यांच्या फूटेजसाठी सामान्यपणे मोठी रक्कम मोजीवी लागते. मात्र सध्याच्या घडी लक्षात घेऊन बीसीसीआयने डीडी स्पोर्ट्सकडून एकही पैसा घेतलेला नाही. बीसीसीआयच्या एका कार्यकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला सरकार आपतकालीन परिस्थितीचा सामना करत आहे. कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये सरकार आणि प्रशासनाकडून घरात बसण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जून्या सामन्यांच्या फ्लॅशबकच्या माध्यमातून बीसीसीआय या लढ्यात देशाला सहकार्य करत आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.  

... आता सोनिया गांधींकडे ती सूचना मागे घेण्याची मागणी

सामान्य स्थितीमध्ये फूटेजसंदर्भात कशा पद्धतीने पैसे आकारले जातात असा प्रश्नही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याला विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की फूटेज कोणते आहे त्यावर त्याचे मूल्य अवलंबून असते. जर २०११ च्या विश्वचषकातील धोनीने लगावलेल्या षटकारासारख्या क्षणाच्या फूटेजसाठी मोठी रक्कम मोजावी लागते, असे उदाहरणही त्यांनी दिले.  लॉकडाऊनच्या काळात  डीडी स्पोर्ट्सवर १४ एप्रिल पर्यंत भारतीय क्रिकेट संघाच्या जून्या सामन्यांचे फूटेज दाखवण्यास सुरुवात केली आहे.