भारतीय संघाने २०११ मध्ये दुसऱ्यांदा मर्यादित षटकांचा विश्वचषक उंचावला. वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघातील खेळाडू क्रिकेटच्या देवाला खांद्यावर घेऊन मिरवल्याचे पाहायला मिळाले होते. या क्षणाला जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित असा लॉरियस पुरस्कार मिळाला आहे.
एबीच्या कमबॅकचा संभ्रम कायम, ड्युप्लेसीस-रबाडाला संधी
२०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील तेंडुलकरच्या अवस्मरणीय फोटोला 'कॅरीड ऑन द शोल्डर्स ऑफ अ नेशन' असे शीर्षक देण्यात आले होते. टेनिसचे महान खेळाडू बोरिस बेकर यांनी या क्षणाला पुरस्कार मिळाल्याची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर स्टीव वॉच्या हस्ते सचिनने सोमवारी बर्लिनमध्ये हा पुरस्कार स्वीकारला.
अखेर धोनीचा ट्रेनिंग प्रोग्राम ठरला!
"This is a reminder of how powerful sport is and what magic it does to all of our lives."
— Laureus (@LaureusSport) February 17, 2020
A God for a nation. An inspiration worldwide.
And an incredible speech from the Laureus Sporting Moment 2000 - 2020 winner, the great @sachin_rt 🇮🇳#Laureus20 #SportUnitesUs pic.twitter.com/dLrLA1GYQS
नऊ वर्षांपूर्वी सहाव्या आणि कारकिर्दीतील अखेरच्या विश्वचषकात विश्वविजेत्या संघाचा सदस्य बनण्याचे सचिनचे स्वप्न पूर्ण झाले होते. विश्वचषक जिंकल्यानंतर संघातील सहकाऱ्यांनी सचिन तेंडुलकरला खांद्यावर घेऊन मैदानाची चक्कर मारल्याचे पाहायला मिळाले होते. एवढेच नाही यावेळी सचिन तेंडुलकरच्या डोळ्यातून आनंदाश्रू आल्याचेही पाहायला मिळाले होते.