पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मेरी कोमनं प्रतिस्पर्धी झरीनला रिंगबाहेरही फटकारले

मरी कोम आणि निखत झरीन

ऑलिम्पिक पात्रता निवड चाचणीतील बहुचर्चित लढतीमध्ये अनुभवी मेरी कोमने नवोदित निखत झरीनला एकहाती पराभूत केले. या सामन्यापूर्वी अनेक विवादित वक्तव्यामुळे निखत झरीन चर्चेत आली होती. तिची काही वक्तव्य अनुभवी मेरी कोमला दुखावणारी होती. मेरी कोम तिच्या वक्तव्यामुळे खूपच दुखावली गेल्याचे चित्र सामन्यानंतर पाहायला मिळाले. सामन्यानंतर मेरी कोमने प्रतिस्पर्धी निखत झरीनसोबत साधे हास्तांदोलन देखील केले नाही. बॉक्सिंगच्या रिंगमधील दोन भारतीय रणरागिनींमधील मतभेदच यातून समोर आले आहेत. एनआयला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये मेरी कोमने यावर भाष्य केले.

ओपन चॅलेंज देणाऱ्या झरीनच्या स्वप्नाचा मेरी कोमकडून चक्काचुरा

मी तिच्यासोबत हास्तांदोलन का करायचे? जर तिला आदर मिळवायचा असेल तर तिने दुसऱ्याचा आदर करायला शिकण्याची गरज आहे. तिच्यासारख्या वृत्तीचे लोक मला अजिबात आवडत नाहीत, अशा शब्दांत मेरी कोमने झरीनला शाब्दिक पंच मारला. जागतिक कनिष्ठ स्पर्धेची माजी विजेती निखत झरीन हिने टोकिया ऑलिम्पिकसाठी बॉक्सिंग खेळाडूंची निवड चाचणी निपक्षपाती व्हावी, अशी मागणी राष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाकडे केली होती.

ICC WTC Point Table: कांगारु करताहेत टीम इंडियाचा पाठलाग

रशियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत निखतच्या ऐवजी भारतीय बॉक्सिंग संघाने मेरी कोमला संधी दिली होती. ५१ किलो वजनी गटात मेरी कोमने कांस्य पदकाची कमाई देखील केली. या स्पर्धेपासूनच निखत आणि मेरी कोम यांच्यातील वादाला सुरुवात झाली. त्यानंतर ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी संघ निवड करण्यापूर्वी मेरी कोमसोबत ट्रायल सामना खेळण्याची संधी मिळावी, अशी इच्छा निखत झरीनने व्यक्त केली होती. शनिवारी महिला गटातील ५१ किलो वजनी गटात ऑलिम्पिक पात्रता निवड चाचणीतील अंतिम फेरीत मेरी कोमने झरीनला ९-० असे पराभूत करत ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी आपले स्थान पक्के केले. टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी चीनमध्ये पात्रता फेरीतील सामने रंगणार आहेत.