पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माजी विकेटकीपर मार्क बाऊचर द. आफ्रिकेचे नवे कोच

मार्क बाऊचर

माजी यष्टिरक्षक मार्क बाऊचर यांची दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. आयसीसी विश्वचषक २०१९पासून द. आफ्रिकेचा संघ संकटातून जात आहे. मार्क बाऊचर २०२३ पर्यंत द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळतील. विश्वचषकानंतर द. आफ्रिकेचा संघ अडचणीत आहे. क्रिकेट द. आफ्रिकेचे (सीएसए) कार्यकारी क्रिकेट संचालक आणि माजी कर्णधार ग्रीम स्मिथ यांनी बाऊचर यांच्या नियुक्तीची घोषणा केली. 

जसप्रीत बुमराहची होणार फिटनेस टेस्ट, समोर 'विराट' आवाहन

'क्रिकबझ'ने स्मिथ यांच्या हवाल्याने म्हटले की, बाऊचर हा अनुभवहीन आणि युवा द. आफ्रिकन टीमला एक मजबूत टीममध्ये परिवर्ततीत करु शकेल, असे मला वाटल्याने त्याला मंडळात आणले आहे. बाऊचरकडे आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून मोठा अनुभव आहे. एक टीमला कसोटीत यशस्वी करण्यासाठी काय करायला हवे ते सर्व बाऊचरकडे आहे.

बाऊचरच्या नेतृत्वाखाली द. आफ्रिकन टीम इंग्लंडबरोबर चार कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर बॉक्सिंग डे कसोटीने होईल.

Video : कोणाचा हे महत्त्वाचं नाही, पण हा झेल एकदा बघाच!

मार्क बाऊचर माजी दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू आहेत. त्यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवण्याचा विक्रम नोंद आहे. त्यांनी यष्टिमागे ५३२ झेल आणि २३ यष्टिचित करण्यासह ५५५ विकेट घेतल्या आहेत. डोळ्याला झालेल्या दुखापतीनंतर मार्क यांनी क्रिकेटमधून सन्यास घेतला होता. जुलै २०१२ मध्ये एका दौऱ्यात यष्टिरक्षण करताना त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली होती.