पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हाची फ्रेंच ओपनमधून माघार

रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हा

रशियन टेनिस स्टार आणि पाचवेळची ग्रँडस्लॅम विजेती मारिया शारापोव्हा हिने फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे जानेवारी पासून ती टेनिस कोर्टच्यावर दिसलेली नाही. २६ मे ते ९ जून दरम्यान रंगणाऱ्या फ्रेंच ओपन स्पर्धेत सहभागी होणार नसल्याची माहिती शारापोव्हाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिली आहे. खांद्याच्या दुखापतीनंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

दादा म्हणतो, विराटच्या नेतृत्वाची तुलना नको!
 
३२ वर्षीय शारापोव्हाने इन्स्टाग्रामवर लिहले आहे की, "मी फ्रेच ओपन स्पर्धेतून माघार घेत आहे. कधी कधी योग्य निर्णय घेणे कठीण असते. चांगली गोष्ट ही आहे की मी सरावासाठी कोर्टमध्ये उतरले असून दुखापतीतून हळू हळू सावरत आहे. पॅरिसला खूप मिस करेन."

IPL चा फायदा झाला, पाकच्या धुलाईनंतर जॉनीचे बोल

२०१२ आणि २०१४ मध्ये शारापोव्हाने फ्रेंच ओपन स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.  उत्तेजक पदार्थ (ड्रग) सेवन चाचणीमध्ये दोषी आढळल्याने आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेने (आयटीएफ) केलेल्या १५ महिन्याच्या बंदीनंतर एप्रिलमध्ये शारापोव्हा टेनिस कोर्टवर उतरली होती. मागील वर्षी झालेल्या फ्रेंच ओपनमध्ये उपांत्य पूर्व फेरीत तिला स्पेनच्या गार्बिन म्युग्युरुझाने २-६, १-६ असे पराभूत केले होते.