जगभरात वेगाने संक्रमण करणाऱ्या कोरोना विषाणूने खेळाच्या मैदानात ही हाहाकार माजला आहे. फुटबॉलपटू पासून ते क्रिकेटर्सलाही या साथीच्या रोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे. इंग्लिश प्रिमियर लगी क्लबच्या आर्सेनल संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकेल अर्टेटा आणि चेल्सीच्या कॅलम हडसन औडाई यांना कोरानाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. आर्सेनलने एक परिपत्रक जारी करुन ट्रेनिंग सेंटर बद केल्याची माहिती दिली आहे.
२८९ प्रवाशांना दुबईला घेऊन जात असलेल्या विमानात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
अस्वस्थ वाटत असल्याने अर्टेटा यांनी तपासणी केली त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. चेल्सी यांनीही कोरोनाची लागण झाल्यामुळे खेळाच्या मैदानापासू दुर रहाण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाच्या मैदानातून कोरोनाबाबत गांभीर्याने न घेतल्याच्या काही प्रतिक्रिया देखील उमटल्याचे पाहायला मिळाले होते. एनबीएतील खेळाडू रूडी गोबार्ट हा त्यातीच एक खेळाडू आहे. त्याच्या सह या खेळ प्रकरातील डोनोवेन मिशेल या खेळाडूलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आता संपूर्ण राज्यात चित्रपटगृहे, स्विमिंग पूल, जीम बंदचा निर्णय
रूडीने सरकारद्वारी जारी केलेल्या सूचनाकडे दुर्लक्ष केले होते. एवढेच नाही तर कोरोनाने भयभीत झालेल्याची त्याने थट्टाही केली होती. सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये आपल्यासमोरील माइकला स्पर्श करत कोरोनाचा फैलावर स्पर्शाने होत नसल्याचे त्याने म्हटले आहोत. असेच वर्तन त्याने ड्रेसिंगरुमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबतही केले होते. रूडी आणि मिशेल यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर एनबीएने हंगामातील सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूजीलंडचा जलदगती गोलंदाज लॉकी फग्यूर्सन आणि ऑस्ट्रेलियाचा केन रिचर्डसन यांनाही कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.