पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी भारतीय हॉकी संघ सज्ज

रानी रामपाल आणि मनप्रीत सिंह

भारतीय हॉकी महासंघाने आगामी एफआयएच हॉकी ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी नुकतीच पुरुष आणि महिला भारतीय संघाची घोषणा केली. १८ सदस्यीय पुरुष संघाचे नेतृत्व मनप्रीत सिंहकडे देण्यात आले असून फॉरवर्ड एस. व्ही सुनील याच्याकडे उप कर्णधारपर सोपवण्यात आले आहे. महिला संघाचे नेतृत्व रानी रामपाल करणार असून उप-कर्णधारपदाची धूरा गोलरक्षक सविता हिच्याकडे देण्यात आली आहे.  

गांगुलीनं मनावर घेतलं तर पुजारा-रहाणेचं वेतन वाढेल

भारतीय पुरुष आणि महिला संघ ओडिशातील भुवनेश्वरमध्ये १ आणि २ नोव्हेबरला आपल्या प्रतिस्पर्धीविरुद्ध दोन हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. आठ वेळा ऑलिम्पिकचे जेतेपद मिळवलेल्या भारतीय पुरुष संघाचा सामना (एफआयएच जागतिक क्रमवारी पाच) जागतिक क्रमवारीत २२ व्या स्थानावर असलेल्या रशियाविरुद्द रंगणार आहे. तर महिला हॉकीच्या क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या भारतीय महिलांचा संघ क्रमवारीत १३ स्थानावर असलेल्या अमेरिकन महिला संघाविरुद्ध भिडणार आहे. 

INDvsSA Day 1 Stumps : भारत ३ बाद २२४ धावा (५८)

पुरूष हॉकी संघ: मनप्रीत सिंह (कर्णधार), पीआर श्रीजेश, कृष्ण बहादुर पाठक, हरमनप्रीत सिंह, वरुण कुमार, सुरेंदर कुमार, गुरिंदर सिंह, रूपिंदर पाल सिंह, अमित रोहिदास, नीलकंठ शर्मा, हार्दिक सिंह, विवेक सागर प्रसाद, ललित कुमार उपाध्याय, एसवी सुनील, मनदीप सिंह, आकाशदीप सिंह, रमनदीप सिंह आणि सिमरनजीत सिंह.

महिला हॉकी संघ: रानी रामपाल (कर्णधार), सविता, रजनी इतिमारपू, दीप ग्रेस एक्का, गुरजीत कौर, रिना खोखर, सलीमा टेटे, सुशीला चानू पुखरंबम, निक्की प्रधान, मोनिका, नेहा गोयल, लिलिमा मिंज, नमिता टोप्पो, वंदना कटारिया नवनीत कौर, लालरेमसियामी, नवजोत कौर आणि शर्मिला देवी.