पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीप : मंजू रानीची फायनलमध्ये धडक

मंजू रानी फायनलमध्ये

जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या मेरी कोमचा सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले असले तरी मंजू रानीनं भारताच्या सुवर्णाची आस जिवंत ठेवली आहे. 

पहिल्यांदाच या स्पर्धेच्या रिंगणात उतरलेल्या मंजूने शनिवारी उपांत्य फेरीत विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे. ४८ किलो वजनी गटात तिने थायलंडच्या चुथामाथ काकसात हिला ४-१ असे पराभूत करत दिमाखदार विजय मिळवला. मंजूने उपांत्य फेरीत विजय पंच मारत रौप्य पदक पक्के केले. आता ती अंतिम फेरीत कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

जागतिक चॅम्पियनशीपः मेरी कोमला कांस्य पदक, तुर्कीच्या खेळाडूकडून पराभव

उल्लेखनिय आहे की, यापूर्वी या वजनी गटात भारताच्या मेरी कोमचे वर्चस्व राहिले आहे. तिने तब्बल सहावेळा सुवर्ण कामगिरी केली आहे. यंदाच्या स्पर्धेत मेरी कोम ५१ किलो वजनी गटातून बॉक्सिंगच्या रिंगणात उतरली होती. सहा वेळच्या जागतिक चॅम्पियन मेरी कोमला यावेळी कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. कारिकोग्लूने मेरी कोमचा ४-१ ने पराभूत केले होते. या सामन्यातील निकालावर भारतीय बॉक्सिंग महासंघाने आक्षेप नोंदवला होता. मात्र निकाल भारताच्या बाजूने लागला नसल्याचने मेरीला कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले होते. 

युवा टेनिस स्टारकडून जोकोविचचा धक्कादायक पराभव!