पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : पांडेजी फलंदाजीत फेल पण क्षेत्ररक्षणात टिपला उत्तम झेल!

मनिष पांडे

ऑस्ट्रेलिया विरुद्ध राजकोटच्या मैदानात सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय  सामन्यातून मिनिष पांडेला संधी देण्यात आली. आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करुन दिली असताना मनिष पांडेला नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले. चार चेंडूत अवघ्या दोन धावा करुन तो मागे फिरला. फलंदाजीतील ढिसाळपणा त्याने क्षेत्ररक्षणात भरून काढला आहे. मोहम्मद शमीच्या  गोलंदाजीवर त्याने ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा एक अप्रतिम झेल टिपला. वॉर्नरने १२ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने १५ धावा केल्या. 

INDvsAUS  दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील अपडेट्स एका क्लिकवर

डेव्हिड वॉर्नरने मुंबईच्या सामन्यात नाबाद शतकी खेळी केली होती. तो दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याची विकेट भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण अशीच आहे. मनिष पांडेच्या झेलची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. त्याने वॉर्नरचा टिपलेल्या झेलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका बाजूला त्याच्या झेलचे कौतुक होत असले तरी काहीजण त्याच्या फलंदाजीवरुन त्याला ट्रोल करत आहेत. मनिष पांडेने २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याने एकदिवसीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. मागील चार वर्षात त्याने २४ एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले असून त्याच्या खात्यात ४४२ धावा जमा आहेत. यात दोन अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे.

INDvsAUS: चाहत्यांचा जीव टांगणीवर असताना कोहलीचे ७१ वे शतक लांबणीवर

पहिल्या सामन्यात ऋषभ पंतला दुखापत झाली होती. परिणामी त्याला संघातून बाहेर रहावे लागले. पंतच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलकडे यष्टिमागची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मनिष पांडेला मध्यफळीत संधी देण्यात आली होती. श्रेयस अय्यरला लोकेश राहुलपेक्षाही अगोदर खेळायला पाठवले. तो अवघ्या ७ धावा करुन परतला. त्यानंतर मनिष पांडेही २ धावांवर बाद झाला. रिचर्डसनच्या गोलंदाजीवर अ‍ॅश्टॉन अगरने त्याच  झेल टिपला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:manish pandey takes a one handed catch at rajkot to send david warner packing during 2nd odi watch video