पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेत मलिंगाची उडी

मलिंगा

श्रीलंकन जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगाने धोनीच्या निवृत्तीवर 'मन की बात' सांगितली आहे. महेंद्रसिंह धोनीने आणखी एक ते दोन वर्ष निवृत्तीचा विचार करुन नये, असे तो म्हणाला आहे. त्याच्या अनुभवाचा युवा खेळाडूंना फायदा असल्याचा उल्लेखही यावेळी मलिंगाने केला. 

ICC WC : हिटमॅन रोहित 'विश्व-विक्रमा'च्या उंबरठ्यावर

भारत-श्रीलंका यांच्यात शनिवारी साखळी सामन्यातील अखेरचा सामना रंगणार आहे. श्रीलंकेचे स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले असून शेवट गोड करण्यासाठी ते सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. दुसरीडे श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी जाण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. 
या सामन्यापूर्वी धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेवर मलिंगा म्हणाला की,  "मला वाटते धोनीने आणखी एक ते दोन वर्ष भारतीय संघासोबत कायम रहावे. मागील १० वर्षात धोनी सर्वोकृष्ट फिनिशरची भूमिका बजावत आहे. भविष्यात त्याला कोणी मात देईल, असे वाटत नाही. त्याने युवा खेळाडूंना पुढील एक ते दोन वर्ष मार्गदर्श द्यावे. भारतीय संघाच्या यशस्वी प्रवासात धोनीच्या अनुभव महत्त्वपूर्ण आहे"

#PAKvsBAN आम्ही ५०० धावा करु, काहीही हं सरफराज!

गेल्या काही सामन्यातील धोनीच्या धीम्या खेळीनंतर त्याच्यावर टीका होत आहे. यंदाच्या विश्वचषकातील अखेरचा सामना हा धोनीचाही अखेरचा सामना असेल, या वृत्ताची चर्चा सध्या जोर धरत असताना मलिंगाने धोनीने खेळत रहावे, असे मत व्यक्त केले.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: mahendra singh dhoni should play for an year or two after world cup 2019 feels lasith malinga