पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाराष्ट्र केसरी: गतविजेत्यांना धक्का! नवे गडी फायनलमध्ये भिडणार

 हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शळके यांच्यात रंगणार फायनल (फोटो कुस्तीमल्लविद्या फेसबुक)

पुण्यातील श्री छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या बाला रफिक शेखला उपांत्य सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. माती विभागात सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेने मागील वर्षीच्या महाराष्ट्र केसरी ठरलेल्या बाला रफिक शेखला आस्मान दाखवले. अवघ्या सव्वा मिनिटांमध्ये ज्ञानेश्वर जमदाडेने बाला रफिक शेखला चितपट करत बाजी मारली. मात्र जमदाडेला अंतिम फेरीत प्रवेश मिळता आला नाही. या गटातून शैलेश शेळकेने त्याला पराभूत करत अंतिम फेरी गाठली. 

हो आफ्रिदी बेस्ट ऑलराउंडर! चोप्रांनी संतप्त चाहत्यांना दिले उत्तर

दुसरीकडे गादी गटातून अभिजित कटके याच्यावरही पराभवाची नामुष्की ओढावली आहे. सलग चौथ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब मिळवायचा असा निश्चय करुन मॅटवर उतरलेल्या अभिजित कटकेला नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने ५-२ अशा फरकाने पराभूत केले. त्यामुळे यावर्षी महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा नवा पैलवान उचलणार हे आता स्पष्ट झाले आहे.  

 

Video : जेम्सनं गल्लीतील पोरासारखी विचित्र पद्धतीनं फेकली विकेट

पैलवान हर्षवर्धन सदगीरयाने महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटकेवर विजय मिळवत महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. माती गटातून पैलवान शैलेश शेळके या काकासाहेब पवारांच्याच पठ्ठ्याने मातीतील कुस्तीतील मोठे नाव असलेला पैलवान माऊली जमदाडेवर विजय प्राप्त करत अंतिम फेरीत प्रवेश करून या वर्षीची महाराष्ट्र केसरीची गदा काकासाहेब पवार यांच्या तालमीत येणार हे पक्के झाले आहे.

 

IndvsSL: नव्या वर्षातील पहिल्या सामन्यात पाऊस ठरला सामनावीर!

काकासाहेब पवार हे नाव महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांसाठी नवे नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल ३१ पदके मिळवून देऊन राज्य सरकारच्या अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या काकासाहेब पवार यांनी आपल्या तालमीत पै. राहुल आवारे, पै. उत्कर्ष काळे, पै. विक्रम कुराडे, यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि ऑलिम्पकच्या शर्यतीतील पैलवान घडवले. पण  काकासाहेब पवार यांच्या तालमीतील मल्लाला महाराष्ट्रात ज्या गदेला कुस्ती क्षेत्रात खूप सन्मान आहे अशी 'महाराष्ट्र केसरी'ची गदा नव्हती.  
 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra kesari bala rafik shaikh and Abhijit Katake out final Round Fight between harshad sadgir and Shailesh Shelke