पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भावा कुस्तीत दोस्ती नाय अन् कुस्तीनंतर अशी दोस्ती पण दिसायची नाय!

महाराष्ट्र केसरी विजेत्या हर्षवर्धनने प्रतिस्पर्धी शैलेशला खांद्यावर घेऊन साजरा केला विजयाचा आनंद

महाराष्ट्र केसरीच्या ६३ व्या स्पर्धेतील अंतिम लढतीमध्ये गादी गटातून आलेल्या हर्षवर्धन सदगीरने माती गटातून आलेल्या शैलेश शेळकेवर मात करत मानाची चांदीची गदा उचलली. विशेष म्हणजे एकाच तालमीतील ही जोड जेव्हा अंतिम सामन्यात दाखल झाली त्यावेळीच यंदाच्या वर्षी नवा महाराष्ट्र केसरी मिळणार हे स्पष्ट झाले होते. दोस्तीत कुस्ती अन् कुस्तीत दोस्ती अशी अनुभूती महाराष्ट्र केसरीच्या यंदाच्या फायनलमध्ये पाहायला मिळाली.  

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर नवा महाराष्ट्र केसरी!

हर्षवर्धनने चांदीची गदा उचलून काकासाहेब पवार तालमीचं बऱ्याच दिवसांपासूनचं स्वप्न साकार केले. महाराष्ट्र केसरी या मानाच्या स्पर्धेतील प्रतिष्ठित गदा त्याने तालमीत आणली. अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध भिडलेले दोन्ही मल्ल एकाच तालमीत एकाच वस्तादाकडून कुस्तीचे डावपेच शिकलेली. मात्र कुस्ती खेळताना दोघांनी दोस्ती बाजूला ठेवून कुस्तीचे डावपेच खेळले. आपल्या खेळीनं त्यानं मॅटवर कमाल दाखवत प्रतिस्पर्धीला शह दिला. पण आनंद व्यक्त करताना त्याने खिलाडूवृत्तीचं अनोख दर्शन दाखवून दिलं. त्याने शैलेशला आपल्या खांद्यावर घेत विजयाचा आनंद साजला केला. कुस्ती खेळताना दोस्ती बाजूला ठेवलेल्या हर्षवर्धनने कुस्तीनंतर दोस्तीची एक मिसाल दाखवून दिली. 

IndvsSL: जाणून घ्या मागील पाच सामन्यातील टीम इंडियाचे रेकॉर्ड@इंदूर

त्याची ही कृती कुस्तीच्या मैदानात खिलाडूवृत्तीच एक उदाहरण सेट करणारी अशी होती. कुस्तीमध्ये अनेकदा मैदानात प्रतिस्पर्ध्याला जायबंदी करण्याचा प्रकार पाहायला मिळतो. गावाकडच्या जत्रेतील कुस्तीपासून ते आंतरराष्ट्रीय आखाड्यातील कुस्तीमध्ये अनेकदा दोन पैलवानांमधील खुन्नस अनकेदा पाहायला मिळाली आहे. पण महाराष्ट्र केसरीच्या मैदानात आज एक अनोख चित्र पाहायला मिळाले. आणि हे चित्र कौतुकास्पद असेच होते.