पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर नवा महाराष्ट्र केसरी!

पै. हर्षवर्धन सदगीर

पुण्यातील श्री छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवान हर्षवर्धन सदगीर याने बाजी मारली आहे. माती गटातून अंतिम फेरीत स्थान मिळवलेल्या शैलेश शेळके याला ३-२ अशी मात देत त्याने महाराष्ट्र केसरीची मानाची गदा उचलली. पैलवान हर्षवर्धन सदगीर याने महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटकेला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत मजल मारली होती. अंतिम सामना जिंकत त्याने अभिजीतसोबतचा विजय हा चमत्कारिक नव्हता तर प्रंचड मेहनतीचे फळ असल्याचे दाखवून दिले आहे. 

IndvsSL: जाणून घ्या मागील पाच सामन्यातील टीम इंडियाचे रेकॉर्ड@इंदूर

काकासाहेब पवार हे नाव महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांसाठी नवे नाही. अंतिम फेरीत दाखल झालेले दोन्ही पैलवान हे त्यांच्यात तालमीतील होते. काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  पै. राहुल आवारे, पै. उत्कर्ष काळे, पै. विक्रम कुराडे, यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि ऑलिम्पकच्या शर्यतीतील पैलवान घडवले. पण काकासाहेब पवार यांच्या तालमीतील मल्लाला महाराष्ट्रात ज्या गदेला कुस्ती क्षेत्रात खूप सन्मान आहे अशी 'महाराष्ट्र केसरी'ची गदा नव्हती. हर्षवर्धनने अखेर हा मान आपल्या तालमीला मिळवून दिलाय.