पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाच्या प्रादुर्भावातही राज्य सरकारकडून IPL ला परवानगी, पण...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धेसंदर्भात संभ्रम

कोरोनामुळे संभ्रम निर्माण झालेल्या आयपीएल स्पर्धेला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. कोरोनाच्या राज्यातील वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीबुधवारी  मुंबईत कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत आयपीएल स्पर्धेला सरकारने हिरवा कंदिल दिला आहे. पण स्पर्धा ही प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात यावी, अशी अट राज्य सरकारने घातली आहे. 

कोरोना बाधितांची ओळख उघड करु नका, प्रशासनाची पुन्हा विनंती

बीसीसीआय आयपीएल सामन्यांची तिकीट तिकीट विक्री न करता सामने खेळवण्यास तयार असेल, तर स्पर्धेसंदर्भात कोणताही आक्षेप नाही, अशी माहिती एका वरिष्ठ मंत्र्यांने कॅबिनेटच्या बैठकीनंतर दिली. आयपीएल स्पर्धेच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. पण प्रेक्षकांशिवाय स्पर्धा खेळवली तर सरकारची याला हरकत नाही, असे ते म्हणाले. आणखी एका मत्र्यांने दिलेल्या माहितीनुसार,  आयपीएल स्पर्धेदरम्यान तिकीटांची विक्री झाली नाही तरी टीव्ही, वेबसाईट आणि जाहिरातीच्या माध्यमातून यंदाच्या हंगामातील नुकसान कमी करु शकते. असे बीसीसीआयचे म्हणणे आहे. उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती कॅबिनेटला दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

INDvsSA : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंसाठी 'प्रोटोकॉल'

लोकप्रिय असलेल्या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता ही स्पर्धा रद्द करावी, अशी मागणी जोर धरत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वी आयपीएल स्पर्धेला परवानगी देणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका मांडली होती. यासंदर्भात बीसीसीआयशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र कॅबिनेटच्या बैठकीत प्रेक्षकांशिवाय स्पर्धा खेळवण्याला राज्य सरकारची काही हरकत नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.  

 सुपर मॉम मेरी कोमचीही ऑलिम्पिकवारी पक्की!

बीसीसीआयकडून आयोजनातील बदलासंदर्भात कोणतीही पुष्टी झालेली नाही. एका बाजूला स्पर्धा रद्द व्हावी, अशी मागणी जोर धरत असताना बीसीसीआय आपल्या भूमिकेवर ठाम आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होईल, असे म्हटले होते. आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार कोरोनासंदर्भातील खबरदारीचे सर्व उपाय योजना करु, असेही गांगुली यांनी म्हटले होते.