पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BCCI सल्लागार समितीमध्ये मदनलाल, आरपीची अन् सुलक्षणाची वर्णी

या तिघांची बीसीसीआयच्या सल्लागार समितीमध्ये वर्णी

माजी क्रिकेटर मदनलाल, आरपी सिंह आणि माजी महिला क्रिकेटर सुलक्षणा नाईक यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. हीच सल्लागार समिती वरिष्ठ क्रिकेट निवड समितीचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या दोन रिक्त जागेवरील सदस्याची निवड करेल.

Australian Open: नवी थीम दिसणार की जोकोव्हिचच भारी ठरणार?

बीसीसीआय निवड समितीचे विद्यमान अध्यक्ष एमएसके प्रसाद (साउथ झोन), गगन खोडा (सेंट्रल झोन) यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार असून या दोन रिक्त जागेवर नवा सदस्य निवडण्याची मुख्य भूमिका सल्लागार समितीवर असेल. बीसीसीआचे सचिव जय शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सल्लागार समितीमध्ये निवड झालेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा एक वर्षांचा असेल. यापूर्वी या तीन सदस्यीय सल्लागार समितीमध्ये कपिल देव, शांता रंगास्वामी आणि अंशुमन गायकवाड यांनी काम पाहिले होते. हितसंबंधाच्या तक्रारीनंतर या तिन्ही माजी क्रिकेटर्संनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. 

मॅच सुपर ओव्हरमध्ये कशी न्यावी हे न्यूझीलंडकडून शिकावं!

सुलक्षणा नाईक यांनी भारतीय महिला संघाकडून ४६ एकदिवसीय सामने आणि ३१ टी-२० सामन्यात यष्टिमागची जबाबदारी सांभाळली आहे. एकदिवसीयमध्ये त्यांच्या नावे ५७४ तर टी-२० मध्ये ३८४ धावांची नोंद आहे. आरपी सिंह यांनी ५८ एकदिवसीय तर १० टी-२० सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. या दोन्हीमध्ये त्यांच्या नावे अनुक्रमे ५९ आणि १५ विकेट्स जमा आहेत. अष्टपैलू क्रिकेटर अशी ओळख असणाऱ्या मदन लाल यांनी भारताकडून ३९ कसोटी आणि ६७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्यांनी कसोटीत १ हजार ४२ आणि एकदिवसीयमध्ये ४०१ धावांची नोंद आहे.