पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsWI T20 : विंडीज विरुद्ध लोकेश राहुलने नोंदवला हा विक्रम

लोकेश राहुल

विडींज विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात लोकेश राहुलने अर्धशतकी खेळी साकारले. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातील सातवे अर्धशतक झळकावण्यापूर्वी लोकेश राहुलने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. ३२ सामन्यातील २९ डावांत त्याने हा पराक्रम केला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये हजारी पार करणारा लोकेश राहुल सातवा भारतीय फलंदाज आहे. 

INDvsWI T20 : जिंकला नाही तरी चालेल पण, 'बलशाली' होऊन परता : लारा

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद हजारी गाठण्याचा विक्रम हा पाकिस्तानच्या बाबर आझमच्या नावे आहे. त्याने २६ डावात हजारी गाठली होती. त्यापाठोपाठ या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे.  कोहलीने १००० धावा पूर्ण करण्यासाठी २७ डाव खेळले होते. या यादीत लोकेश राहुल ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचसोबत संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहे. दोघांनी हजारीचा टप्पा पार करण्यासाठी २९ वेळा फलंदाजी केली आहे.  

INDvsWI T20I : कोहलीने षटकाराने साकारला 'विराट' विजय

सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी फिरल्यानंतर लोकेश राहुलने कर्णधार विराट कोहलीसोबत शतकी भागीदारी केली. ही जोडीच भारतीय संघाला विजय मिळवून देईल, असे वाटत असताना लोकेश राहुल ६२ धावांवर पोलार्डकडे झेल देऊन बाद झाला.