पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वॉटसनसह चेन्नई ट्रॅकवरुन घसरली, मलिंगाच्या जीवावर मुंबईचा विजयी चौकार

मुंबई इंडियन्सने चौथ्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरले.

सलामीवीर शेन वॉटसनला धावबाद करत चेन्नई सुपर किंग्जच्या विजयी मार्गाची पटरी बदलून मुंबई इंडियन्सने चौथ्यांदा आयपीएलच्या चषकावर नाव कोरले. शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने अवघ्या एका धावेन सामना जिंकला. चेन्नई सुपर किंग्जला निर्धारित २०   षटकात ७ बाद १४७ धावांपर्यंत मजल मारता आली. लसिथ मलिंगाने या सामन्यात केवळ एकच विकेट घेतली असली तरी तोच मुंबई इंडियन्सच्या विजयाचा खरा हिरो ठरला.

 Video : बर्थडे बॉय पोलार्डने असा व्यक्त केला संताप!

अखेरच्या अठरा चेंडूमध्ये ३८ धावांची गरज असताना कृणाल पांड्याच्या घेऊन आलेल्या अठराव्या षटकात वॉटसनने सलग तीन उत्तुंग षटकार लगावले. मुंबई इंडियन्सने दिलेल्या १५० धावांचा पाठलाग करताना सलामीवीर फाफ ड्युप्लेसीस १३ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २६ धांवाची झटपट खेळी करुन माघारी परतला. त्यानंतर मैदानात आलेल्या सुरेश रैना (८) अंबाती रायडू (१), आणि एमएस धोनी अवघ्या २ धावा करुन परतल्यानंतर चेन्नईचा संघ अडचणीत सापडला. या परिस्थितीत सलामीवीर शेन वॉटसनने एक बाजू लावून धरली. त्याने ब्रावोच्या (१५) च्या साथीने चेन्नईला सामन्यात आणले. मात्र, मलिंगाच्या अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर वॉटसन ८० धावांवर थांबली. दोन चेंडूत दोन धावांची गरज असताना मलिंगाने शार्दुल ठाकूरला पायचित करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.  मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक दोन बळी घेतले तर राहुल चहर, कृणाल पांड्या आणि मलिंगा यांनी प्रत्येकी एक गडी मिळवला.  

फिरकीपटू ताहिरचा कहर, विक्रमासह पर्पल कॅपवर कब्जा

हैदराबादच्या मैदानात रंगलेल्या आयपीएलच्या बाराव्या हंगामातील अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने चेन्नईसमोर १५० धावांचे आव्हान ठेवले होते. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक या दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. क्विंटन डी कॉकने दिपक चहरचा चांगलाच समाचार घेतला. चहरने आपल्या पहिल्या स्पेलमध्ये दोन षटकात २२ धावा दिल्या. चहरची धुलाई झाल्यामुळे चेन्नई कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या चिंता वाढल्या होत्या. मात्र शार्दुल ठाकूरने क्विंटन डिकॉकच्या खेळीला ब्रेक लावत सामना चेन्नईला पुन्हा सामन्यात आणले.   

  IPL 2019 MI v CSK : आकड्यांचा कल मुंबईच्या बाजूने

क्विंटन डी कॉकने ४ षटकाराच्या मदतीने १७ चेंडूत २९ धावांची खेळी केली. मुंबईला पहिला धक्का दिल्यानंतर धोनीने पुन्हा आपला प्रमुख गोलंदाज दिपक चहरच्या हाती चेंडू सोपवला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत दिपक चहरने रोहित शर्माला धोनीकरवी झेलबाद केले. रोहित शर्माने १ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १४ चेंडूत १५ धावा केल्या. सूर्यकुमार यादव आणि इशान किशनचा मुंबईच्या डाव सावरण्याचे मनसुबे ताहिरने उधळून लावले. ताहिरने आपल्या पहिल्याच षटकात सूर्यकुमार यादवला माघारी धाडले. त्याने १५ धावांचे योगदान दिले. त्यानंतर शार्दुल ठाकूरने कृणाल पांड्याला ७ धावांवर बाद करत मुंबईच्या अडचणी वाढवल्या. इमरान ताहिरने आपल्या दुसऱ्या षटकातही विकेट मिळवण्याचा सिलसिला कायम ठेवला. त्याने इशान किशनला २३ धावांवर रैनाकरवी झेलबाद केले. हार्दिक पांड्या १६ धावा करुन माघारी परतल्यानंतर केरन पॉलार्डने ३ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने २५ चेंडूत ४१ धावा करत मुंबई इंडियन्सच्या धावफलकावर निर्धारित २० षटकात ८ बाद १४९ लावल्या.  चेन्नईकडून दिपक चहरने सर्वाधिक तीन तर शार्दुल ठाकूर आणि इमरान ताहिर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:live score of ipl 2019 final csk vs mi at rajiv gandhi international stadium hyderabad ipl 2019 final