पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvWI 1st Test Match: रोहित बाकावर, असा आहे भारतीय संघ

लोकेश राहुल

अँटिग्वाच्या मैदानात सुरु असलेल्या विंडीज आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. अपेक्षप्रमाणे भारताकडून लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल जोडीने भारताच्या डावाची सुरुवात केली. मात्र टीम इलेव्हनमध्ये रोहित शर्माला स्थान मिळालेलं नाही. सामन्यापूर्वी गांगुलीने रोहित आणि अजिंक्य दोघांनाही संधी द्यावी असे म्हटले होते. मात्र भारतीय संघ व्यवस्थापनाने पहिल्या कसोटी सामन्यात रोहितला बाकावर बसवले आहे. 

INDvWI 1st Test Match: रोहित-अजिंक्यबाबत गांगुलीचं थेट मत

सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्माच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक केले होते. विश्वचषकातील त्याची सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर रोहितला संघात संघात स्थान मिळायला हवे, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले होते. पण अखेर टीम इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळालेली नाही. 

भारताच्या डावाच्या सुरुवातीलाच रोचनं भारताला दोन धक्के दिले. सलामीवीर मयंक अग्रवाल (५) आणि चेतेश्वर पुजारा (२) धावा करुन परतला असून कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुलवर भारताचा डाव सावरण्याची जबाबदारी आहे. 

भारतीय संघ
मयंक अग्रवाल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टिरक्षक),  रविंद्र जडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह 
विंडीज संघ
जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, डॅरेन ब्रावो, शामार बूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस,  शेनॉन गॅब्रिएल, शिम्रॉन हेटमायर, मिगुएल कमिंस, केमा रोच, शाय होप

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Live india vs west indies 1st test live score update from Sir Vivian Richards Stadium North Sound Antigua ind vs wi 1st test match live score update on sony ten network india vs west indies live online streaming on sony live