गतवेळचा उपविजेत्या न्यूझीलंडने विश्चषकाची सुरुवात विजयाने केली. त्यांनी श्रीलंकेचा १० विकेटने पराभव केला. मध्यमगती गोलंदाज मॅट हेन्री (२९ धावा देत ३ विकेट) आणि लोकी फर्ग्युसन (२२ धावा देत ३ विकेट) यांनी शानदार गोलंदाजी केली. त्यानंतर सलामीवीर मार्टिन गप्टिल (५१ चेंडूत ७३ धावा) आणि कॉलिन मुन्रो (४७ चेंडूत ५८ धावा) यांनी न्यूझीलंडला १६.१ षटकातच १० विकेट राखून विजय मिळवून दिला.
Not the flashiest shot of his innings, but it was all the @blackcaps needed to seal victory at from the bat of @manuz05! #BACKTHEBLACKCAPS #CWC19 pic.twitter.com/b6bFhBxnaG
— ICC (@ICC) June 1, 2019
हेन्रीने श्रीलंकेची आघाडीची फळी उद्ध्वस्त केली तर फर्ग्युसनने मधली फळी तंबूत परत पाठवण्यात महत्वाची भूमिका निभावली. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीसाठी आलेला कर्णधार करुणारत्नेच्या नाबाद ५२ धावांमुळे २९.२ षटकांत श्रीलंकेला सर्वबाद १३६ धावा करता आल्या. सराव सामन्यात भारताला पराभूत करणाऱ्या न्यूझीलंडने केवळ १६.१ षटकांत बिनबाद १३७ धावा करत विजयी अभियानास सुरुवात केली.
'विराटचा भारतीय संघ भारी, पण विश्वचषक स्पर्धा सर्वांसाठी खुली'
न्यूझीलंडने विश्वचषकात विक्रमी तिसऱ्यांदा १० विकेटने विजय नोदवला आहे. तर करुणारत्ने विश्वचषकात रिडले जेकब्सनंतर (नाबाद ४९, वेस्ड इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मँचेस्टर १९९९) संपूर्ण डावात सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत नाबाद राहणारा दुसरा फलंदाज ठरला. करुणारत्नेशिवाय श्रीलंकेकडून कुशल परेरा (२९) आणि थिसारा परेरा (२७) या दोघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. ज्या पिचवर श्रीलंकन फलंदाजांना धावा काढणे कठीण जात होते. त्यावर गप्टिल आणि मुन्रोने सहज धावा काढल्या. श्रीलंकेसाठी कोणतीच गोष्ट अनुकूल नव्हती.