एक वर्षाच्या बंदीनंतर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या डेव्हिड वॉर्नरच्या अर्धशतकाच्या मदतीने शनिवारी ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा सात विकेट्सने पराभव केला. पाच वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाने सर्वांत प्रथम अफगाणिस्तानला ३८.२ षटकांत २०७ धावांवर रोखले आणि त्यानंतर त्यांनी ३५ षटकात विजयी लक्ष्य गाठले. ब्रिस्टल येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात वॉर्नरने नाबाद ८९ धावा केल्या.
डावखुरा फलंदाज वॉर्नरने कर्णधार अॅरोन फिंचबरोबर डावाची सुरुवात केली. फिंचने ४० चेंडूत ३ षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. वॉर्नर सुरुवातीपासूनच आक्रमक होता. त्याला १९ धावांवर जीवदानही मिळाले होते. अफगाणिस्तानला पहिले यश १७ व्या षटकांत मिळाले. अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नेबच्या चेंडूवर मुजीब उर रहमानने फिंचचा झेल टिपला. फिंचने ६६ धावा बनवल्या.
Video : बोलू पण बंबईया हिंदीत, चहलसोबत शास्त्रींच शास्त्र
वॉर्नरने ७४ चेंडूत अर्धशतक केले. राशिद खानने उस्मान ख्वाजाला बाद केले. त्यानंतर स्मिथ फलंदाजीस आला. पण तोही स्वस्तात बाद झाला. १८ धावांवर हजरतुल्लाह जजईने त्याला बाद केले. बाद झाल्यानंतर मैदानाबाहेर जात असलेल्या स्मिथची प्रेक्षकांनी हुर्रे उडवली.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला ३८.२ षटकांत २१७ धावांवर रोखले. काऊंटी मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा दबदबा राहिला. त्यांनी अफगाणिस्तानचे ८ विकेट १६६ धावांवर बाद केले होते. परंतु, राशिद खानने ११ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २७ धावा बनवून संघाला २०० धावांचा टप्पा पार करुन दिला.
World Cup : गड्यांनो विराटला एकटे पाडू नका, सचिनचा शिलेदारांना संदेश