पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मेस्सीचा विक्रमी षटकार, सोहळ्याला रोनाल्डोची दांडी

मेस्सी

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सीने फिफा 'फुटबॉलर ऑफ द इयर' चा सहाव्यांदा पुरस्कार मिळवत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. इटलीतील मिलान येथे झालेल्या रंगारंग कार्यक्रमात मेस्सीने हा पुरस्कार स्विकारला. या कार्यक्रमाला ख्रिस्तियानो रोनाल्डो अनुपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले. फिफा 'प्लेयर ऑफ द इयर' च्या शर्यतीत मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यासह नेदरलँडचा फुटबॉलपटू वर्जिल वान दिक हा देखील शर्यतीत होता.  

तिच्या 'ग्रेट' भाषणावर रोहित म्हणाला, ग्रेटा तू आमची 'प्रेरणा' आहेस

बार्सिलोनाच्या कर्णधाराने सहाव्यांदा हा पुरस्कार मिळवला. यापूर्वी २००९, २०१०, २०११, २०१२ आणि २०१५ मध्ये त्याने हा पुरस्कार पटकावला होता. २००७ मध्ये ब्राझीलचा काकाने हा पुरस्कार पटकावल्यानंतर आतापर्यंत रोनाल्डो आणि मेस्सी या दोघांमध्येच या पुरस्कारासाठीची स्पर्धा सुरु आहे. पोर्तुगालच्या रोनाल्डोने पाचवेळा हा पुरस्कार मिळवला आहे. मात्र मागील वर्षी रोनाल्डो मेस्सीला मागे टाकत कोएशियाचा मिडफील्डर लुका मोड्रिचने हा पुरस्कार पटकावला होते. 

दादा म्हणाला होता, 'कुठंन धरुन आणलय याला!

या कार्यक्रमात सर्वश्रेष्ठ प्रशिक्षक म्हणून लीव्हरपूल क्लब संघाचे मॅनेजर जर्गन क्लॉप यांना सन्मानित करण्यात आले. त्यांनी मागील वर्षी टीमला चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले होते. सर्वोत्तम  गोलकीपरला दिल्या जाणाऱ्या पुरस्कारावर लीव्हरपूलच्या एलिसनने आपले नाव कोरले.

यंदापासून महिला खेळाडूंचीही या पुरस्कारने गौरव करण्यास सुरुवात झाली. फिफा 'वूमन फुटबॉलर ऑफ द इयर' चा पुरस्कार मिळवणारीमेगन रपिनोला पहिली महिला खेळाडू ठरली. सर्वोत्तम महिला गोलकीपरचा पुरस्कार नेदरलँडच्या वैन वीनेदाल तर अमेरिकेन संघाच्या जिल एलिस यांनी सर्वोत्तम महिला प्रशिक्षक म्हणून गौरवण्यात आले. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Lionel Messi wins FIFA player of the year record sixth time as Cristiano Ronaldo skips ceremony