युरोपीय लीगमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा पराक्रम करणाऱ्या बार्सिलोना कर्णधार लिओनेल मेस्सीला ‘बलॉन डी ओर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोमवारी पॅरिसमध्ये रंगलेल्या पुरस्कार सोहळ्यात आपली पत्नी आणि मुलांच्या उपस्थितीत मेस्सीने विक्रमी सहाव्यांदा हा पुरस्कार पटकावला.
IPL 2020 Auction: ९७१ क्रिकेटर्सची नोंदणी, यात २०० हून अधिक परदेशी
फुटबॉलसह अन्य क्षेत्रातील दिग्गज मंडळी या सोहळ्याला उपस्थित होते. ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विक्रम मागे टाकत त्याने सर्वाधिक वेळा हा पुरस्कार मिळवला आहे. यापूर्वी रोनाल्डो-मेस्सी यांनी प्रत्येकी पाचवेळा हा पुरस्कार पटकावला होता. फ्रान्स फुटबॉल मॅग्जीनकडून देण्यात येणाऱ्या या मानाच्या पुरस्कारासाठी ३० फुटबॉलपटूंचे नामांकन आले होते. यामध्ये मेस्सीशिवाय ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि विर्गिल वान डिज्क यांचाही समावेश होता.
टी-20 विश्व विक्रम : १३ चेंडूत एकही धाव न देता ६ विकेट घेणारी मर्दानी!
मेस्सीने २००९ से २०१२ सलग चारवेळा या पुरस्कारावर नाव कोरले होते. त्यानंतर २०१५ मध्ये पुरस्कार पटकावल्यानंतर तब्बल चार वर्षांच्या अंतराने त्याने विक्रमी सहाव्यांदा पुन्हा हा पुरस्कार पटकावला. मेस्सीचा या वर्षातील चौथा मोठा पुरस्कार आहे. यंदाच्या वर्षात मेस्सी चांगलाच फॉर्ममध्ये आहे. गोल्डन शू, फिफा सर्वोत्तम फुटबॉलर आणि ला लीगा सर्वोत्तम फुटबॉलपटू हे पुरस्कारावरही त्याने यंदाच्या वर्षात नाव कोरले आहे.