पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फिफा वर्ल्ड कप पात्रता: मेस्सीवर निलंबनाची कारवाई

मेस्सी

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू आणि अर्जेंटिना स्टार लिओनेल मेस्सीला फिफा विश्वचषक (२०२२) पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. दक्षिण अमेरिकेच्या फुटबॉल महासंघाने मेस्सी विरुद्ध ही कारवाई केली असून त्याला १ हजार ५०० डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दक्षिण अमेरिकेत २०२२ च्या विश्व चषकासाठीच्या पात्रता फेरीतील सामने मार्चपासून सुरु होणार आहेत.   

कोपा अमेरिका स्पर्धेतील तिसऱ्या स्थानासाठी चिली विरुद्धच्या सामन्यात मेस्सीला 'रेड कार्ड' मिळाले होते. या सामन्यातील खेळाच्या ३७ व्या मिनिटाला मेस्सी चिलीच्या गॅरी मेडलशी भिडला होता. यावेळी रेफ्रींनी दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवला. हा सामना अर्जेंटिनाने २-१ असा जिंकला होता. 

जोकोव्हिच अन् त्याच्या पत्नीमध्ये काही तरी बिनसल्याची चर्चा!

मेस्सीविरोधातील निलंबनाच्या कारावाईमध्ये त्याने कोपा अमेरिका महासंघावर केलेल्या गंभीर आरोपाचा कोणताही उल्लेख केलेला नाही. कोपा अमेरिका स्पर्धेत भ्रष्टाचार झाला असून ब्राझीलला विजेते ठरवण्यासाठी संपूर्ण तयारी केली गेली होती, असा आरोप मेस्सीने स्पर्धेच्या आयोजकांवर केला होता. या आरोपानंतर मेस्सीने कोपा अमेरिका फुटबॉल महासंघाची माफीही मागितली होती.