पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मेस्सीवर ३ महिन्यांच्या निलंबनासह तब्बल ५० हजार डॉलरचा दंड

लिओनेल मेस्सी

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला आंतरराष्ट्रीय फूटबॉलमधून तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. अमेरिका कोपा फुटबॉल स्पर्धेतील चिली विरुद्धच्या तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीदरम्यानच्या सामन्यात मेस्सीला रेड कार्ड मिळाले होते. ब्राझीलसाठी यजमानांनी स्पर्धेत फिक्सिंग केल्याचा आरोपही मेस्सीने केला होता. 

बीबीसीच्या वृत्तानुसार, ३२ वर्षीय मेस्सीला निलंबनाशिवाय ५० हजार डॉलरचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. निलंबनाविरोधात दाद मागण्यासाठी मेस्सीकडे सात दिवसांचा अवधी आहे. निलंबनाच्या कारवाईमुळे मेस्सी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये चिली, मॅक्सिको आणि जर्मनी विरुद्ध होणाऱ्या मैत्रीपूर्ण सामन्यात मैदानात उतरु शकणार नाही.  अर्जेंटिना पुढील वर्षी मार्चमध्ये २०२२ मध्ये रंगणाऱ्या विश्वचषकासाठीच्या पात्रता फेरीसाठी मैदानात उतरणार आहे.  

फिफा वर्ल्ड कप पात्रता: मेस्सीवर निलंबनाची कारवाई

फुटबॉल महासंघाच्या ७.१ आणि ७.२ या नियमावलीच्या आधारे मैदानातील आक्रमकता, अपमानजनक व्यवहार या प्रकरणात मेस्सीवर ही कारवाई करण्यात आली आहे. आणखी एका कलमानुसार त्याच्यावर निवाड्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे.