पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मेस्सीचा आणखी एक पराक्रम, हॅटट्रिकसह पुरस्काराचा षटकार

मेस्सी

युरोपीय लीगमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा पराक्रम करणाऱ्या बार्सिलोनाच्या कर्णधार लिओनेल मेस्सी आणखी एक मानाचा पुरस्कार मिळाला आहे. या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल त्याला गोल्डन बूट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आतापर्यंतचा त्याने  सहाव्यांदा हा पुरस्कार पटकवला असून यंदा त्याने हा पुरस्कार मिळवण्याची हॅटट्रिकही नोंदवली. 

INDvSA: राग नडला! दुखापतीमुळे मार्करम कसोटीला मुकणार

मेस्सीने यंदाच्या वर्षात  ३६ गोल केले आहेत. या शर्यतीत पॅरिस सेंट जर्मेनचा कायलियान एम्बापे ३३ गोलसह दुसऱ्या स्थानवर राहिला. आपल्या मुलांच्या हस्तेच त्याने हा पुरस्कार स्वीकारला. यापूर्वी मेस्सीने फिफाकडून दिला जाणारा 'फुटबॉल ऑफ द इयर' पुरस्कार मिळवत एक विश्वविक्रम प्रस्थापित केला होता.   २००९, २०१०, २०११, २०१२ आणि २०१५ नंतर त्याने यंदा पुन्हा या पुरस्कारावर नाव कोरले होते.   

अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताच सौरव गांगुली घेणार हा मोठा निर्णय

'फुटबॉल ऑफ द इयर' पुरस्कार सर्वाधिक वेळा पटकवण्याचा विक्रम मेस्सीच्या नावे आहे. २००७ मध्ये ब्राझीलचा काकाने पुरस्कार पटकावल्यानंतर या पुरस्काराच्या शर्यतीत मेस्सी रोनाल्डो यांच्यात शर्यत लढल्याचे पाहायला मिळाले. रोनाल्डने आतापर्यंत पाचवेळा हा पुरस्कारावर नाव कोरले आहे.