पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video: या अप्रतिम गोलसह मेस्सीने रोनाल्डोला टाकले मागे

मेस्सी

स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी दमदार खेळीच्या जोरावर एफसी बार्सिलोनाने स्पॅनिश लीगच्या १० व्या हंगामातील सामन्यात रिअल वालाडोलिडला ५-१ असे पराभूत केले. या विजयासह बार्सिलोनाने २२ गुणांसह पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वलस्थान मिळवले.या विजयात मेस्सीने अप्रतिम खेळ दाखवत विजयात मोलाचा वाटा उचलला.

शाकिबसाठी काय पण! बांगलादेशमध्ये क्रिकेट चाहते उतरले रस्त्यावर

सामन्यातील दोन गोलच्या जोरावर त्याने ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विक्रम मागे टाकला. मेस्सीने आतापर्यंत क्लबकडून खेळताना ६०७ गोल नोंदवले आहेत. त्याने या सामन्यात रोनाल्डोचा ६०६ गोलचा विक्रम मागे टाकला. बार्सिलोनाच्या संघाने सुरुवातीपासूनत आक्रमक खेळ केला. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला डिफेंडर क्लेमेंट लेंग्लेने गोल डागत संघाला आघाडी मिळवून दिली. १५ व्या मिनिटात वालाडोलिडने बरोबरी साधली. किको ओलिवासने बराबरीचा गोल डागला.

रोहितच्या नेतृत्वाखाली यांना मिळेल कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी

मात्र त्यानंतर बार्सिलोनाने त्यांना पुन्हा गोल करण्याची संधी दिली नाही. मेस्सीने २० गज अंतरावरुन फ्री-किकच्या जोरावर अप्रतिम गोल डागल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या या गोलची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.