पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनी काश्मीर खोऱ्यात पेट्रोलिंग अन् गार्डची ड्युटी करणार

महेंद्रसिंह धोनी

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पॅरा रेजिमेंटसोबत प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. ३१ जुलैपासून १५ ऑगस्टपर्यंत धोनीला बटालियन सोबत काश्मीर खोऱ्यात पेट्रोलिंग (गस्त घालणे), गार्ड आणि पोस्ट ड्युटीसाठी तैनात करण्यात येणार आहे. त्याचे युनिट काश्मीरमधील विक्टर फोर्सचा एक भाग आहे.    

३८ वर्षीय धोनी पॅराशूट  रेजिमेंट (106 पॅरा टीए बटालियन) सोबत प्रशिक्षण घेत आहे. धोनीला २०११ मध्ये पॅराशूट रेजिमेंटकडून ‘मानद लेफ्टनंट कर्नल’ किताब देण्यात आला होता. त्याच्यासोबत अभिनव बिंद्रा आणि दीपक राव या खेळाडूंनाही सन्मानित करण्यात आले होते. 

धोनीच्या लष्करी प्रशिक्षणाची इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूकडून खिल्ली

२०१५ मध्ये आग्रा येथील पॅरा रेजिमेंट येथील प्रशिक्षणामध्ये लष्करात कार्यरत होण्याची पात्रता सिद्ध केली होती. क्रिकेट सोडल्यानंतर लष्करात सक्रिय होण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली होती. धोनीने विश्वचषकानंतर विंडीज दौऱ्यावर उपलब्ध नसल्याचे जाहीर केले होते.