भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार आहे. परंतु, यावेळी तो संपूर्ण सामना नव्हे तर केवळ एक षटक फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पण सचिन हे केवळ एक आव्हान पूर्ण करण्यासाठी करणार आहे. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू आणि जगातील क्रमांक एकची महिला गोलंदाज एलिस पेरीने सचिनला हे आव्हान दिले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने तिच्या गोलंदाजीचा सामना करण्याचे आव्हान दिले आहे.
पुन्हा भाजप सरकार आणल्याशिवाय दिल्लीवारी नाहीः फडणवीस
पेरीने म्हटले आहे की, सचिन तू माझ्या एका षटकाचा सामना करु शकशील का. यावर सचिन तेंडुलकरनेही त्वरीत उत्तर दिले. होय, मी अवश्य सामना करेन. माझ्या खांद्याच्या दुखण्यामुळे डॉक्टरांनी असे करण्यास मनाई केली आहे. तरीही मी मैदानात एक षटक खेळण्यासाठी निश्चित उतरेन. मला आशा आहे की, या चांगल्या कामातून बुशफायर पीडितांसाठी चांगली रक्कम जमा करता येईल आणि तुला मला बादही करता येईल.
...तर आम्ही राहुल गांधींना अंडे फेकून मारुः रामदास आठवले
दरम्यान, बुशफायर क्रिकेट सामन्याचे आयोजन मेलबर्नच्या जंक्शन ओवल मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यातून जमा होणारी रक्कम ऑस्ट्रेलिय रेडक्रॉस आपत्ती निवारण फंडाला देण्यात येणार आहे.
Delhi Exit Poll:दिल्लीत पुन्हा केजरी सरकार, भाजपच्याही जागा
ऑस्ट्रेलियात काही दिवसांपूर्वी बुशफायरमुळे लाखो जनावरे होरपळून मृत्युमुखी पडली होती. आगीमुळे अनेक घरांची राखरांगोळी झाली होती. या हानीमुळे नुकसान झालेल्यांना दिलासा देण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवृत्त क्रिकेटपटूंमध्ये एका सामना आयोजित केला आहे. हा सामना पॉटिंग इलेव्हन विरुद्ध गिलख्रिस्ट इलेव्हन यांच्यात होणार आहे.