पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गांगुली, पॉन्टिंगचा सहवास विश्वचषकासाठी फायदेशीर ठरेल: धवन

शिखर धवन

भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन आगामी विश्वचषकासाठी दिग्गजांकडून धडे घेत आहे. आयपीएलच्या मैदानात धवन दिल्ली कॅपिटलकडून सलामीवीराची भूमिका बजावत आहे. या संघासोबत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळत आहे, असे धवनने म्हटले आहे. पॉन्टिंग हा दिल्लीच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धूरा सांभाळत असून गांगुली या संघाच्या व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून काम पाहत आहे.  

क्रिकेटच्या मैदानातील माजी दिग्गजांबद्दल बोलताना धवन म्हणाला की,  आयपीएलच्या हंगामात पॉटिंग आणि गांगुली या दिग्गजांसोबत असल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळत आहे. याचा मला आयपीएलसह आगामी विश्वचषकात निश्चितच फायदा होईल. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत धवनची सुरुवात ही अडखळत झाली होती. मात्र, आता तो लयीत दिसत आहे. त्याच्यासह दिल्लीचा संघही फार्मात आहे.  

भारताकडून १२८ एकदिवसीय सामने खेळताना धवनने ५३५५ धावा केल्या आहेत. आगामी विश्वचषकात शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्यावर भारताच्या डावाला चांगली सुरुवात करण्याची मुख्य जबाबदारी आहे. सध्याच्या घडीला क्रिकेटच्या मैदानातील ही जोडी आघाडीवर आहे.  माजी दिग्गजांशिवाय धवनने दिल्लीचा संघ सहकारी आणि युवा फलंदाज पृथ्वी शॉचेही कौतुक केले. वयाच्या १९ व्या वर्षी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणे मोठी गोष्ट आहे. भविष्यात तो भारतीय संघासाठी तो चांगले योगदान देईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.