पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC Test Ranking: स्मिथला मागे टाकत कोहली पुन्हा अव्वलस्थानी

विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला मागे टाकत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा अव्वलस्थानी विराजमान झालाय. कोहली आणि स्मिथ यांच्यात ५ गुणांचे अंतर आहे.  पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यातील अपयशामुळे स्मिथला अव्वलस्थान गमवावे लागले. 

विराटचा लाडक्या सहकाऱ्यासोबत 'सेल्फी मूड'

अ‍ॅडलेड कसोटी सामन्यात स्मिथला ३६ तर ब्रिस्बेनच्या मैदानात त्याला केवळ ४ धावा करता आल्या होत्या. दुसरीकडे बांगलादेश विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीने १३६ धावांची धमाकेदार खेळी केली होती. या कामगिरीमुळे विराट कोहलीच्या खात्यात ९२८  प्वॉइंट्स जमा झाले आहेत. तर स्टीव्ह स्मिथच्या खात्यात ९२३ प्वॉइंट्स  जमा आहेत. 

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं काम अंतिम टप्प्यात

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने फलंदाजांच्या क्रमवारीत चांगली झेप घेतली आहे. त्याने पहिल्या पाच फलंदाजात स्थान मिळवले. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्रिशतकी खेळीसह वॉर्नरने ४८९ धावा केल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर क्रमवारीत त्याची १२ स्थानांनी सुधारणा करत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: latest icc test batting ranking virat kohli on top again steve smith on 2nd position david warner in top 5